शिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणात, महादेवराव महाडिक यांची घोषणा : पक्ष मात्र गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:56 IST2018-09-15T16:53:27+5:302018-09-15T16:56:09+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले. सम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत.

शिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणात, महादेवराव महाडिक यांची घोषणा : पक्ष मात्र गुलदस्त्यात
कोल्हापूर : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले. सम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत.
सम्राट हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर असतानाच महाडिक यांनी भाजपच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात लढणाऱ्या उमेदवारीची घोषणा करून खळबळ उडवून दिली. येथील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी महागणपतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी आवर्जून ‘सम्राट महाडिक कोठे आहेत, त्यांनी व्यासपीठावर यावे,’ असे जाहीर केले. उपस्थितांना काही समजायच्या आतच त्यांनी ‘सम्राट महाडिक हे शिराळा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असतील,’ असे जाहीर केले.
शिवाजी चौकातील महागणपतीचे आशीर्वाद घेऊन कामाला लागण्यासाठी सम्राटला बोलाविले असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.परंतू ते कोणत्या पक्षांतून निवडणूक लढविणार हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही. या मतदारसंघाचे सध्या भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघातून मानसिंगराव नाईक हे उमेदवार असतील. काँग्रेसकडून सत्यजित देशमुख यांचे नांव चर्चेत आहे.