एम.ए., एम. कॉम., एलएल.एम.चे अर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:13 IST2020-08-26T14:11:19+5:302020-08-26T14:13:39+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.ए., एम.कॉम. व एलएल.एम. भाग एक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

M.A., M. Com., LL.M. | एम.ए., एम. कॉम., एलएल.एम.चे अर्ज भरण्यास मुदतवाढ

एम.ए., एम. कॉम., एलएल.एम.चे अर्ज भरण्यास मुदतवाढ

ठळक मुद्देएम.ए., एम. कॉम., एलएल.एम.चे अर्ज भरण्यास मुदतवाढशिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाचा निर्णय

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.ए., एम.कॉम. व एलएल.एम. भाग एक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे संबंधित विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून विद्यापीठ प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ अधिविभागात भाग दोन आणि तीन या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संबंधित अधिविभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थी, विद्यार्थिनींनी याबाबत अधिविभागांशी दूरध्वनी अथवा ईमेलद्वारे संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.

प्रवेशासाठी अधिविभागात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पदव्युत्तर प्रवेश विभागाकडून देण्यात आली आहे.
 

Web Title: M.A., M. Com., LL.M.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.