शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: बदल्यासाठी हनी ट्रॅपद्वारे प्रेमाची भुरळ घातली, अन् लूटमार केली; महिलेसह पाचजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:52 IST

वहिनीची विनंती, दिराचा कट

कोल्हापूर : मोबाइलवर अश्लील संभाषण करणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी हनी ट्रॅपद्वारे प्रेमाची भुरळ घालून त्याची लूटमार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (दि. १७) एका महिलेसह पाचजणांना अटक केली. बालिंगा पाडळी (ता. करवीर) येथे २५ जूनला झालेल्या लूटमारीनंतर किरण उत्तम पाटील (रा. जठारवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पाटील हा मोबाइलवरून अश्लील संभाषण करीत असल्याच्या रागातून त्याचा काटा काढावा किंवा त्याला अद्दल घडवावी, असे कोमल पाटील हिने तिचा दीर इंद्रजीत याला सांगितले. त्यानंतर इंद्रजित याने इन्स्टाग्रामवर शुभांगी कदम या नावाचे बनावट खाते तयार करून किरण याच्यासोबत चॅटिंग सुरू केले.प्रेमाची भुरळ घालून त्याला २५ जूनला बालिंगा पाडळी येथील एका शाळेजवळ बोलवले. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या एका मोपेडवरून आलेल्या तिघांनी किरण याला अडवून, ‘आमच्या बहिणीला अश्लील मेसेज का करतोस?’ अशी विचारणा करीत मारहाण केली. तसेच जबरदस्तीने त्याच्याकडील मोबाइल आणि दोन हजार रुपये काढून पोबारा केला.यांना झाली अटककोमल कृष्णात पाटील (२९), इंद्रजित कृष्णात पाटील (२८, दोघे रा. आकुर्डे, ता. पन्हाळा), नितीन पांडुरंग पाटील (३२), मोहसिन चांदसाब मुल्ला (२४) आणि करण शरद रेणुसे (२३, तिघे रा. कोपार्डे, ता. करवीर) या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली. फिर्यादी किरण पाटील याला मारहाण करून त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाइल, दोन हजारांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एक लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील तपासासाठी पाचही संशयितांचा ताबा करवीर पोलिसांकडे देण्यात आला.

वहिनीची विनंती, दिराचा कटफिर्यादी किरण पाटील हा मोबाइलवर अश्लील संभाषण करून त्रास देत होता, असा दावा संशयित कोमल पाटील हिने केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तिच्या विनंतीवरूनच दीर इंद्रजित याने कट करून मित्रांच्या मदतीने लूटमार केल्याचे तपासात समोर आले.

यांनी केली कारवाईउपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह सागर चौगले, प्रीतम मिठारी, रणजित कांबळे, रफिक आवळकर आणि सुप्रिया कात्रट यांनी गुन्ह्याचा तपास केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस