वृध्देच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारुन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:44 IST2019-03-19T16:42:03+5:302019-03-19T16:44:19+5:30

विश्वनाथ को. आॅप. हौसिंग सोसायटी माळी कॉलनी येथे चालत घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील अडीच तोळ्याची बोरमाळ दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली. हा प्रकार रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

Lumpas by killing bullocks in the neck | वृध्देच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारुन लंपास

वृध्देच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारुन लंपास

ठळक मुद्देवृध्देच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारुन लंपासमाळी कॉलनी येथील प्रकार

कोल्हापूर : विश्वनाथ को. आॅप. हौसिंग सोसायटी माळी कॉलनी येथे चालत घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील अडीच तोळ्याची बोरमाळ दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली. हा प्रकार रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

अधिक माहिती अशी, विमल भुपाल सैबन्नावर (वय ६५) या आपल्या दोन मुलीसोबत रविवारी रात्री घरी चालत निघाल्या होत्या. यावेळी पाठिमागून दूचाकीवरुन दोन अनोळखी तरुण आले. त्यापैकी मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारुन भरधाव वेगाने पोबारा केला.

अचानक घडलेल्या प्रकाराने त्या व मुली भयभित झाल्या. त्यांनी चोर..चोर म्हणून आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी या तिघींना धिर देत त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर सोमवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. माळी कॉलनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा माग पोलीस घेत आहेत.

 

Web Title: Lumpas by killing bullocks in the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.