शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

‘नाईट लँडिंग’ सुविधा नसल्याने विमानसेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:37 AM

विमानसेवेला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नाईट लँडिंग सुविधा लवकर उपलब्ध होत नसल्याने त्याचा फटका या विमानसेवेला बसत आहे.

ठळक मुद्दे‘नाईट लँडिंग’ सुविधा नसल्याने विमानसेवेला फटकाअन्यथा सेवा बंद होण्याचा धोका; लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून विमानसेवेच्या माध्यमातून कोल्हापूर हे तिरूपती, बंगलोर, हैदराबाद आणि मुंबई या मोठ्या शहरांशी जोडले गेले आहे. या सेवेला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नाईट लँडिंग सुविधा लवकर उपलब्ध होत नसल्याने त्याचा फटका या विमानसेवेला बसत आहे.

धुके आणि खराब हवामान झाल्यास विमानफेरी रद्द करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नसल्याचे चित्र आहे. नाईट लँडिंग सुविधा लवकर उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा, पुन्हा एकदा विमानसेवा बंद होण्यास वेळ लागणार नाही.

नाईट लँडिंग सुविधेसाठी आवश्यक असलेल्या कामांपैकी धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १४० मीटर जागेचे सपाटीकरण झाले आहे. विमान उड्डाणक्षेत्रातील काही अडथळे दूर केले आहेत; मात्र जे शिल्लक आहेत, त्यांवर आॅब्स्टॅकल लाईट लावण्याचे काम राज्य शासनाकडून होणार आहे. त्यासाठी कामाचा आदेश आणि जिल्हा नियोजन मंडळाकडून १४ लाखांचा निधी मिळाला आहे.

या कामाचे सर्वेक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणने केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोव्हेंबर २०१८च्या दुसऱ्या आठवड्यात बैठक झाली. त्यात १५ दिवसांमध्ये हे लाईट बसविण्याचे काम सुरू होईल, असे महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात काहीच झालेले नाही.

‘नाईट लँडिंग’ सुविधा उपलब्ध झाल्यास खराब हवामान, धुके आणि अंधुक प्रकाशामुळे कोल्हापूरमध्ये उतरणारे आणि तेथून अन्य शहरांत जाणारे विमान रद्द करण्याची वेळ येणार नाही. ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी राज्य शासन आणि स्थानिक पातळीवरील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणकडे ठोस पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

नाईट लँडिंगबाबतची वर्षभरातील कार्यवाही

  • ३ जानेवारी २०१९ : मार्चपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याची केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही
  •  २ सप्टेंबर : या सुविधेसाठीच्या आवश्यक असणाºया आॅब्स्टॅकल लाईट लावण्याचे काम सुरू
  •  नोव्हेंबर : या लाईट बसविण्याचे काम १५ दिवसांत काम सुरू करणार असल्याची महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती.
  • १६ जानेवारी २०२० : नाईट लँडिंग सुविधेसाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी.

केंद्रीय गृहमंत्र्यांसह १५० प्रवाशांना फटकाआॅक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूरला येणार होते. मात्र, खराब हवामान असल्याने आणि नाईट लँडिंग सुविधा नसल्याने त्यांना कोल्हापूरला जाण्यासाठी दिल्लीमध्ये दोन तास प्रतीक्षा करावी लागली. सप्टेंबरमध्ये खराब हवामानामुळे मुंबईतून कोल्हापूरला विमान आले नाही. त्याचा फटका ८५ प्रवाशांना, तर दोन दिवसांपूर्वी तिरूपतीला जाणारे विमान रद्द झाल्याने ६५ प्रवाशांना फटका बसला.

नाईट लँडिंग सुविधेसाठी आवश्यक असलेली अन्य कामे पूर्ण होत आली आहेत. त्याबाबत विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून सध्या पाहणी सुरू आहे. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर या सुविधेबाबत पुढील कार्यवाही होईल.- कमल कटारिया, संचालक, विमानतळ प्राधिकरण

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर