भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर १७ला पहिला मस्तकाभिषेक श्रवणबेळगोळला सोहळा : चारशेंवर मुनी, माताजींचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:34 PM2018-01-31T23:34:31+5:302018-01-31T23:34:37+5:30

सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

 Lord Ganesha arrives on 17th of the first mastakabhishek Shravanabelagola on Lord Buddha's statue | भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर १७ला पहिला मस्तकाभिषेक श्रवणबेळगोळला सोहळा : चारशेंवर मुनी, माताजींचे आगमन

भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर १७ला पहिला मस्तकाभिषेक श्रवणबेळगोळला सोहळा : चारशेंवर मुनी, माताजींचे आगमन

Next

सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला
७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे.
मस्तकाभिषेक महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी बुधवारी सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जगद््गुरू चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बाहुबली मस्तकाभिषेकाची तयारी पूर्ण झाली आहे. ७ फेब्रुवारीला भगवान आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण महोत्सवाने सोहळ्याला सुरुवात होईल. १६ फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण महोत्सव चालणार आहे. त्यानंतर पहिला मस्तकाभिषेक १७ ला होणार आहे.

या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसोबत ४०० हून अधिक पिंच्छिधारी मुनी व त्यागीगण सहभागी झाले आहेत. श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमानसागर महाराज, चंद्रप्रभूसागर, पंचकल्याणसागर, देवनंदी महाराज, पद्मनंदी महाराज व त्यांचे २० त्यागी, विशुद्धसागर महाराज व त्यांच्यासमवेत ३५ त्यागी, पुष्पदंत सागर महाराज यांच्यासमवेत १ त्यागी, याशिवाय जिनसेन महाराज, सच्छिदानंद महाराज, वासूपुज्य देवसेन महाराज, अमितसागर महाराज, आदर्शसागर महाराज, प्रसन्नश्रुषीजी महाराज, मुनीश्री चिन्मयसागर (जंगलवाले बाबा), गणिनी आर्यिका जिनमती माताजी, क्षमाश्री माताजी, विभाश्री माताजी यांचे आगमन झाले आहे.
दररोज चार लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

भोजन व्यवस्थेची जबाबदारी कोलकाता येथील जैन समाजाने स्वीकारली आहे. संपूर्ण देशभरातून साखर, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, मसाले, केसर, काजू, चहा, कॉपी, फळे, भाजीपाला व इतर भोजन सामग्री दान स्वरूपात येत आहे. सांगली, बेळगाव, चिक्कोडी, अथणी, जमखंडी या परिसरातून ५०० टनांहून अधिक साहित्य पाठविण्यात आले आहे. महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन (चेन्नई), कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र कुमार (बंगलोर), सचिव सतीश जैन (दिल्ली), राकेश सेठी (कोलकाता) आदी, सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

सांगली, कोल्हापूरकरांसाठी २३ला अभिषेक
सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांतील जैन श्रावक-श्राविकांसाठी २३ फेब्रुवारीला भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभिषेकसाठी कलश नोंदणीचे काम सुरू आहे. तरी या तीन जिल्ह्यांतील भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

Web Title:  Lord Ganesha arrives on 17th of the first mastakabhishek Shravanabelagola on Lord Buddha's statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.