शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘लोकमत’चे फलक मोर्चात उत्स्फूर्तपणे झळकले, दांभिकतेला चपराक दिल्याची मोर्चेकऱ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:11 IST

गावकऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभार

कोल्हापूर : धार्मिक ठिकाणी सुरू असलेल्या दांभिकतेवर ‘लोकमत’ने प्रहार करून देव आणि भक्तांमधील अंतर अधिक जवळ आणले आहे. ‘लोकमत’ची ही पत्रकारिता खऱ्या अर्थाने समाजाशी जोडली गेली आहे, या शब्दांत भोगावती खोऱ्यातील ग्रामस्थांनी ‘लोकमत’च्या भूमिकेचे कौतुक केले.वाडी रत्नागिरीतील जोतिबा देवस्थानचे पुजारी व परिते ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादानंतर ‘लोकमत’मध्ये ‘लगाव बत्ती’ या सदराखाली रविवारी (दि. २९) ‘दांभिकतेचा उन्माद’ हा लेख प्रसिद्ध झाला. पुजाऱ्यांविरोधात परिते ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात या लेखाचे फलक घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.

वाचा: गुंडप्रवृत्ती हटवा...जोतिबावर पगारी पुजारी नेमा; परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी 

गावकऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभारपरिते ग्रामस्थांनी या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गावकऱ्यांची रविवारी बैठक घेतली होती. या बैठकीतही ‘लोकमत’च्या या लेखाची जोरदार चर्चा झाली. चूक बरोबर कोण, यापेक्षा देव आणि भक्तांमध्ये जे अंतर पाडतात, अशा ठिकाणच्या दांभिकतेचा पर्दाफाश केल्याबद्दल गावकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

वाचा: आम्ही डोकं टेकवायचं, तुम्ही जनावरासारखं बदडायचं, हा उन्माद सहन करणार नाही

अन् सगळ्यांच्या मोबाइलला ‘लोकमत’चे स्टेटसपुजाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चादरम्यान भोगावती खाेऱ्यातील ग्रामस्थांच्या मोबाइलचे स्टेटस ‘लोकमत’च्या ‘दांभिकतेचा उन्माद’ या लेखाने भरून गेले होते. महिलांसह तरुणांनीही हा लेख स्टेटसला ठेवला, अनेकांनी सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर हा लेख शेअर केला होता.

‘लोकमत’मध्ये ‘लगाव बत्ती’ या सदराखाली प्रसिद्ध झालेला ‘दांभिकतेचा उन्माद’ हा लेख खऱ्या अर्थाने दांभिकता दाखवणाऱ्यांच्या डाेळ्यांत जळजळीत अंजन घालणारा आहे. ‘लोकमत’ची ही पत्रकारिता समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देणारी आहे. - मोहन ढेरे, परिते 

जोतिबा मंदिरावरील पुजारी आणि परिते ग्रामस्थांमध्ये वाद झाला. पुजाऱ्यांनी खोटेनाटे आरोप केले. मात्र, ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेला ‘दांभिकतेचा उन्माद’ हा लेख ज्यांनी वाचला त्यांना चूक कुणाची आहे, हे कळाले आहे. हा लेख कुणाच्या बाजूने नाही तर जे दांभिकपणा करतात त्यांना सणसणीत चपराक देणारा आहे. - ऋतुराज पाटील, परिते, ता. करवीर

जिथे धार्मिक भावना जोडल्या जातात तिथे दांभिकतेने उच्छाद गाठला आहे. ‘लोकमत’ने हीच दांभिकता उजेडात आणून पत्रकारितेचा धर्म जोपासला आहे. - जयसिंग पाटील, मालवे, ता. राधानगरी

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat's Stand Against Hypocrisy Resonates in Kolhapur Protest

Web Summary : Lokmat's article exposing hypocrisy at Jotiba temple sparked a protest. Villagers marched with Lokmat's article, praising its role in bridging the gap between devotees and the divine. The article became a viral status, underscoring Lokmat's impact.