शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

लोकमत महामॅरेथॉन : गुरुजितसिंग, सायली कुपटे यांची खुल्या गटात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 15:46 IST

संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, उत्तर कर्नाटकातील धावपटूंसह सर्वसामान्यांची उत्कंठा लागून राहिलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ सीझन-२ अर्थात दुसऱ्या पर्वातील २१ कि.मी. खुल्या गटात पुरुषांमध्ये गुरुजितसिंग याने प्रथम; तर महिलांमध्ये सायली कुपटे हिने प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली. गुरुजितसिंगने नाशिक महामॅरेथॉनमध्ये डिफेन्स २१ कि.मी. रनही जिंकली होती.

ठळक मुद्देलोकमत महामॅरेथॉन : गुरुजितसिंग, सायली कुपटे यांची खुल्या गटात बाजीडिफेन्समध्ये राजेश कुमार यादव, तर महिलांत जयश्री बोरगी प्रथमज्येष्ठांत सुरेश कुमार, तर महिलांत शोभा देसाई

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, उत्तर कर्नाटकातील धावपटूंसह सर्वसामान्यांची उत्कंठा लागून राहिलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ सीझन-२ अर्थात दुसऱ्या पर्वातील २१ कि.मी. खुल्या गटात पुरुषांमध्ये गुरुजितसिंग याने प्रथम; तर महिलांमध्ये सायली कुपटे हिने प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली. गुरुजितसिंगने नाशिक महामॅरेथॉनमध्ये डिफेन्स २१ कि.मी. रनही जिंकली होती.

सायली कुपटेपोलीस परेड मैदान येथे रविवारी सकाळी झालेल्या या महापर्वात चार हजारांहून अधिक धावपटू, नवोदित, सरकारी कर्मचारी, अधिकारी, आमदार, सुपर क्लासवन अधिकारी आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. प्रत्येक सहभागी धावपटूंनी क्रमांक येवो न येवो; मात्र, सहभाग घेतलेले किलोमीटर धावून पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे अनेकांनी ही रन पूर्ण केली.

गटनिहाय सविस्तर निकाल असा २१ कि.मी. खुला गट-१) (बीब क्रमांक -के २११८०)-गुरुजितसिंग, नाशिक (१ तास ११ मि.०३ सेकंद), २) (बीब क्र. के २११७७)-अक्षय बाळू अलांडे, (१ तास ११ मि.४८ सेकंद), ३) (बीब. क्र. के २१३३४)- तानाजी चौगले (१ तास १२ मि.२९ सेकंद).

 महिलांमध्ये १) (बीब क्र. के २१११४)-सायली बलराम कुपटे, गडहिंग्लज (महागाव) (१ तास ३० मि. ३५ सेकंद), २) (बीब क्र. के २१३२२)- राजश्री परिहार (१ तास ३७ मि. ३३ सेकंद), ३) (बीब क्र. २१०६६) प्रतीक्षा (१ तास ४० मि. १४ सेकंद).

२१ कि.मी. (डिफेन्स) पुरुष - १)(बीब. क्र. डी २१०१५)-राजेश कुमार यादव, २) (बीब. क्र.२१०१४)-मराबोई संपत, ३)(बीब. क्र. २१०१८)-अमरसिंग पवरा
 महिलांमध्ये १) (बीब. क्र. डी. २१०१६)-जयश्री बोरगी, २) (बीब. क्र. डी. २१०२२)-मिताई देसाई, ३) (बीब. क्र. डी. २१००६)-अश्विनी देवरे.

२१ कि. मी. ज्येष्ठ-पुरुष-१) (बीब. क्र.के.२११४०)-सुरेश कुमार, २) (बीब. क्र. के २१२९३)-पांडुरंग पाटील, ३) (बीब. क्र. के २१२८४)- कैलास माने,
महिलांमध्ये १) (बीब. क्र. के २१२९१)- शोभा देसाई, २)(बीब. क्र.- के २११००)-पल्लवी मूग, ३)(बीब. क्र. के २१०७७)-विद्या दापोडकर.

१० कि.मी. खुला गट (पुरुष)-१) (बीब. क्र. के १०२९६)- महादेव कुंभार, २) (बीब. क्र. के १०२९८)-गौरव पवार, ३)(बीब. क्र. के १०२२९)-सौरभ आमटे

महिलांमध्ये १)(बीब. क्र. के १०३३०)-स्वाती वानवडे, २) (बीब. क्र. के १०२६१)-सायली कोकीतकर, ३) (बीब. क्र. के १०००४)-पूजा शिरडोले.१०. कि.मी. पुरुष (ज्येष्ठ)-१) (बीब. क्र. के १०२१२)-सुरेंद्र कुमार, २)(बीब. क्र. के १०१५५)-विश्वास चौगुले, ३) (बीब. क्र. के १०१८६)-रमेश चिवलकर, तर महिलांमध्ये १) अनिता पाटील, २) माधुरी निमजे, ३) दीपा तेंडुलकर, यांचा समावेश आहे.या विजेत्यांना महापौर सरिता मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मधुरिमाराजे, उपमहापौर भूपाल शेटे, क्वेस्ट टूर्सचे प्रसाद पाटकर, वारणा दूध संघाचे के. एम. वाले, शिवाजी जंगम, समित कदम, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर, संजय घोडावत विद्यापीठाचे विपणन व्यवस्थापक अभिजित लाटकर, क्रीस्टा इलेव्हटर्सच्या जॉर्इंट मॅनेजिंग डायरेक्टर स्नेहा रेवाळे, विद्याप्रबोधिनीचे चेअरमन राहुल चिकोडे, संदीप युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर (अ‍ॅडमिशन) डी. डी. शिंदे, माणिकचंद आॅक्सिरिचचे फँ्रचाईजी व कशीश फुड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रोचे रमेश लालवाणी, विन्टोजीनोचे चेअरमन प्रकाश उपाध्याय, आसमाचे अध्यक्ष राजू परुळेकर, अमरदीप पाटील, स्टुडंट वेल्फेअरचे अरिफ मन्सुरी, लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट बी. बी. चांडक, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर