शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Kolhapur Maha Marathon : दिव्यांग बांधावसह विशेष मुलांचा सहभाग; प्रोत्साहनपर रनचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 19:04 IST

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अनेक दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.

ठळक मुद्देदिव्यांग बांधावसह विशेष मुलांचा सहभागप्रोत्साहनपर रनचे आयोजन

कोल्हापूर : ‘ब्लेड रनर’ आॅस्कर पिस्टोरियने कृत्रिम पाय लावून सशक्त असलेल्या पुरुषांच्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत सर्वांनाच धक्का दिला होता. एरव्ही सराव नसताना दोन पायांसह धावतानाही अनेकांची तारांबळ उडते. मात्र, ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अनेक दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.सकाळी आठ वाजता या मॅरेथॉनची सुरुवात झाली. त्यामध्ये चेतना विकास मंदिर व जिज्ञासा विकास मंदिर येथील ५० मुलांनी सहभाग घेतला होता. ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संयोजिका रूचिरा दर्डा, आमदार प्रकाश अबिटकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, क्लायमेक्स जाहिरात संस्थेचे उदय जोशी, महालक्ष्मी इस्पातचे अभिषेक गांधी यांच्या हस्ते झाले.

महामॅरेथॉनमध्ये विशेष मुलांसाठी खास एक किलोमीटर ‘प्रोत्साहन रन’चे आयोजन केले. या रनची सुरवात होताच उपस्थितीत धावपटू व पालकांनी टाळ्या वाजवून सर्वांनाच प्रोत्साहन दिले. काही पालक व संबंधित लोक दिव्यांगासमवेत या रनमध्ये सहभाग झाले व पळण्यासाठी उर्जा दिली.

तीन व पाच किलोमीटर फिनिशिंग लाईन येथे हे धावपटू येताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला तर आपण आपले टार्गेट पूर्ण केल्याचा आनंद या मुलांच्यावर चेहऱ्यांवर दिसत होता. ‘या स्पर्धेत सहभागी होऊन आम्हाला खूप आनंद झाला, आम्हाला येथे परत येण्यासाठी आवडेल’ अशा बोलक्या प्रतिक्रिया विशेष मुलांनी व्यक्त केल्या.

 

गतिमंद मुले हे समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत, हे आपण सर्वांनी ओळखून आमच्या मुलांना यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. येथील नेटके नियोजन, व्यवस्था पाहून मुले खूप खूश झाली आहेत.विशाल दीक्षित,जिज्ञासा विकास मंदिर 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर