शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत हेल्पलाईन’ : वर्ष उलटले, तरी वाळू आयातीचे धोरण ठरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 12:59 IST

महसूलमंत्री, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे विनंती करून वर्ष उलटले, तरी परदेशातून वाळू आयात करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. वाळू आयातीचे धोरण हे शासनाकडून निश्चित झाले नसल्याने बांधकाम क्षेत्रासह वाळू पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे वर्ष उलटले, तरी वाळू आयातीचे धोरण ठरेना‘लोकमत हेल्पलाईन’ :बांधकाम क्षेत्रासमोर अडचण

कोल्हापूर : महसूलमंत्री, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे विनंती करून वर्ष उलटले, तरी परदेशातून वाळू आयात करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. वाळू आयातीचे धोरण हे शासनाकडून निश्चित झाले नसल्याने बांधकाम क्षेत्रासह वाळू पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.या अडचणीबाबतची व्यथा डोणोली (ता. शाहूवाडी) येथील बांधकाम साहित्य वितरक उत्तम पाटील यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे व्यक्त केली. फिलीपाईन्स, मलेशियातून बांधकामासाठी वाळू आयात करणे आणि त्याचा साठा करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी उत्तम पाटील यांनी दि. १ मार्च २०१८ रोजी पत्राद्वारे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर या जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आल्याप्रमाणे त्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा केली. त्यानंतर ३० आॅगस्टला परवानगी मागणीबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला.

या दरम्यान परदेशातील वाळू आयात करण्याबाबतचे राज्यात धोरण, नियमावली नसल्याची माहिती पुढे आली. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दि. २९ आॅक्टोबरला, तर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिवांना दि. २ नोव्हेंबरला पत्र दिले.

महसूलमंत्री पाटील यांच्याकडून त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे उत्तर मिळाले. परवानगी मिळण्याबाबत महसूलमंत्री, अपर मुख्य सचिव आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रत्येकी एक स्मरण पत्र पाठविले आहे; मात्र, अद्याप काहीच झालेले नाही.

कोल्हापूरमध्ये वाळू टंचाई आहे. त्यातच परदेशातून वाळू आयात करण्यास परवानगी मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. गोवा, कर्नाटक, केरळ, चेन्नई, आदी राज्यांमध्ये परदेशातून वाळू आयात केली जाते. त्या धर्तीवर महाराष्ट्रात परवानगी देण्यास काहीच हरकत नाही. शासनाने परवानगीचा हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी उत्तम पाटील यांनी केली आहे.

परदेशातील वाळू वजनावर, स्वस्तपरदेशातून वाळू ही वजनावर येणार आहे. सध्या कोल्हापुरातील बाजारभावापेक्षा ५00 रुपये प्रतिब्रास इतकी स्वस्त ही वाळू मिळणार आहे. या वाळूचा दर्जा चांगला असून, ती पर्यावरणपूरक आहे. कोल्हापुरात वाळू टंचाई असल्याने बांधकामांची गती काहीशी मंदावली आहे. त्याचा परिणाम रोजगार उपलब्धता, बाजारातील उलाढाल, आदींवर होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी पुरेशी आणि चांगल्या दर्जाची वाळू उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने परदेशातून वाळू आयात करण्यास राज्य शासनाकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे.

कोल्हापुरातील माझ्यासह आणखी काही बांधकाम साहित्य वितरकांनी परदेशातून वाळू आयात करण्यासाठी तेथील निर्यातदार कंपन्यांसमवेत करार केला आहे. या करारांची मुदत संपत आली आहे. आम्ही परवानगीची मागणी केल्यानंतर त्याबाबत शासनाचे धोरण नसल्याचे समोर आले. हे धोरण लवकर निश्चित होऊन वाळू आयातीसाठी परवानगी मिळावी. राज्यात वाळूचा तुटवडा असल्याने परदेशातून वाळूची आयात करण्याचा सरकार विचार करत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्यादृष्टीने सरकारकडून कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.- उत्तम पाटील,बांधकाम साहित्य वितरक 

 

टॅग्स :sandवाळूkolhapurकोल्हापूर