लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने 

By समीर देशपांडे | Updated: July 31, 2024 16:42 IST2024-07-31T16:41:24+5:302024-07-31T16:42:09+5:30

कोल्हापूर : लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली. माने हे लोकसभेवर दुसऱ्यांदा ...

Lok Sabha Shiv Sena Parliamentary Party Deputy Leader MP Dhairyasheel Mane  | लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने 

लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने 

कोल्हापूर : लोकसभाशिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली. माने हे लोकसभेवर दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत.

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कळविले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. सर्व नवनिर्वाचित खासदारांची शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धैर्यशील माने यांची लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी एकमताने निवड करण्यात आले असल्याचे शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना कळवले आहे.

Web Title: Lok Sabha Shiv Sena Parliamentary Party Deputy Leader MP Dhairyasheel Mane