शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:03 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या समोर येणार आहे, या आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मोठा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या ४ जून रोजी समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या पोलमध्ये एनडीए पुन्हा देशात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महायुतीकडून धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून सत्यजीत पाटील यांनी निवडणूक लढवली. दरम्यान, आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी निकालाआधी मोठा दावा केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विजयाबाबत मोठा दावा केला आहे. 

महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

"सर्व सामान्य जनतेवर माझा विश्वास आहे, २०१९ मध्ये माझा पराभव झाला. त्यानंतर मी या मतदारसंघातील लोकांना भेटत राहिलो, आंदोलने करत राहिलो.  पराभव मनात न ठेवता मी काम करत राहिलो. वेगवेगळ्या प्रश्नावर भीडत राहिलो. माझा जनतेशी संपर्क असल्यामुळे मला कोणत्या नेत्याची गरज नाही. सत्याचा आग्रह धरुन मी नेहमी आम्ही आंदोलने करत असतो. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी माझ्यामागे होती, असंही राजू शेट्टी म्हणाले.

"महाविकास आघाडीकडे जे नेते होते ते सगळे कारखानदार होते. महायुतीचे जे नेते होते ते सत्ताधारी नेते होते. या दोन्ही नेत्यांच्या विरोधात मी या निवडणुकीत उतरलो होतो. मी सामान्य माणसावर विश्वास ठेवून मी निवडणुकीत उभा होतो. शंभर टक्के मी पन्नास हजार ते एक लाख मताधिक्क्याने निवडून येऊ शकतो, असा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. 

एक्झिट पोलचा अंदाज काय

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे पण निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. दरम्यान, आता टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरे गटाचे सत्यजित पाटी आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस