शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

Lok Sabha Election 2019 : विनय कोरेंची होणार कोंडी, ‘धनुष्यबाणा’चा करावा लागणार प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 4:25 PM

ज्यांच्याविरोधात सहा महिन्यानंतर निवडणूक लढवायची आहे त्यांच्याच ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ ‘जनसुराज्य’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर येणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र ही शक्यता आता धूसर झाली आहे.

ठळक मुद्देविनय कोरेंची होणार कोंडी, ‘धनुष्यबाणा’चा करावा लागणार प्रचारचंद्रकांत पाटील यांनी घेतली कोरे यांची भेट

कोल्हापूर : ज्यांच्याविरोधात सहा महिन्यानंतर निवडणूक लढवायची आहे त्यांच्याच ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ ‘जनसुराज्य’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर येणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र ही शक्यता आता धूसर झाली आहे.पन्हाळा, शाहूवाडी मतदारसंघामध्ये गेली १0 वर्षे विनय कोरे आणि शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्यातील संघर्ष पहावयास मिळत आहे. जुन्या मतदारसंघातून एकदा आमदार झालेले सत्यजित पाटील यांचा कोरे यांनी २00९ च्या निवडणुकीत पराभव केला होता. तर त्याआधी २00४ मध्ये कोरे यांनी यशवंत एकनाथ पाटील यांचाही पराभव केला होता.

२00९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोरे यांनी बाजी मारत राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदही पटकावले होते.गेल्या विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांनी सत्तेत आलेल्या युतीपैकी भाजपशी जवळीक वाढवली आणि ते सत्तेसोबत राहिले आहेत. २00९च्या लोकसभा निवडणुकीवेळी कोरे यांनी राजू शेटटी यांना विरोध करत निवेदिता माने यांच्यामागे आपली ताकद लावली होती. तर २0१४ ला त्यांचा जनसुराज्य पक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पाठीशी राहिला होता.या लोकसभेला शेटटी यांच्याविरोधात सदाभाऊ खोत यांना उतरवण्याच्या हेतूने गेले वर्षभर हालचाली सुरू होत्या. याचाच एक भाग म्हणून खोत यांनी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने दौरे लावत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा धडाका लावला.सरलेला ऊस हंगाम सुरू होण्याआधी शेटटी यांच्या ऊस परिषदेच्या आधी वारणानगरजवळ खोत यांनी ऊस परिषद घेऊन त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह तीन,चार मंत्री उपस्थित ठेवले होते. या सर्व घडामोडी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सुरू होत्या.मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने , तसेच उमेदवारीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून धैर्यशील माने यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी पेच निर्माण झाला आहे. आपण आता जर धनुष्यबाणाचा प्रचार केला तर सहा महिन्यानंतर हाच ‘धनुष्यबाण’ सत्यजित पाटील यांच्या रूपाने आपल्या विरोधात उभारणार असल्याने कोरे अस्वस्थ झाले आहेत.यातूनच त्यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची भेट घेत सदाभाऊंचे नाव पुढे आणले आहे. यासाठी मुंबईत बैठकांवर बैठका झाल्या आहेत. त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना ‘मातोश्री’वर बोलावून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार बदलला जाणार का ?शिवसेना या ठिकाणी नमते घेणार का? तसे न झाल्यास कोरे ‘धनुष्यबाणा’चा प्रचार करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVinay Koreविनय कोरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर