शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

परिक्षेत्रात यापूर्वी काम केल्याचा लोहिया यांना होणार फायदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 22:52 IST

कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीणमध्ये २०१४ मध्ये सलग तीन वर्षे पोलीस अधीक्षक पदाची धूरा सांभाळलेले मनोज लोहिया यांच्याकडे आता संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राची धूरा आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची सोयीप्रमाणे ही बदली झाली म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

ठळक मुद्देपरिक्षेत्रात यापूर्वी काम केल्याचा लोहिया यांना होणार फायदाच डॉ. सुहास वारके यांचे काम कोल्हापूरात पण मन मुंबईत

तानाजीपोवार

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीणमध्ये २०१४ मध्ये सलग तीन वर्षे पोलीस अधीक्षक पदाची धूरा सांभाळलेले मनोज लोहिया यांच्याकडे आता संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राची धूरा आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची सोयीप्रमाणे ही बदली झाली म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

कोल्हापूर परिक्षेत्रातील साताऱ्यामध्ये १९८८ मध्ये परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, पुणे ग्रामीणमध्ये २०१४ मध्ये सलग तीन वर्षे पोलीस अधीक्षकपदाची धुरा सांभाळलेले मनोज एस. लोहिया यांच्याकडे आता संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राची धुरा आली. नांदेड येथे त्यांच्यासाठी कौटुंबिक अडचण होती. त्यांना विनंतीनुसार कोल्हापूर मिळाल्याने ते तितक्याच प्रखरपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे.

गेले दीड वर्ष कोल्हापूर परिक्षेत्राची धुरा सांभाळताना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी चांगले काम केले; पण त्यांचे पूर्ण कुटुंबच मुंबईत राहत असल्याने त्यांचे कर्तृत्व कोल्हापुरात व मन नेहमी मुंबईकडेच आडकलेलेच असायचे. त्यामुळे त्यांच्या सोयीप्रमाणे ही बदली झाली म्हटल्यास वावगे ठरणार नाही.मूळचे जालनाचे असलेले मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्रातून कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली. त्यांना नांदेड सोडायचे होते, तेथे त्यांची कौटुंबिक अडचण मोठी असल्याने त्यांना पुणे अगर मुंबई येथे काम करायचे होते, पण कोल्हापूर हा पुण्याचा भाग असल्याने येथे चांगले काम करून दाखवेन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सातारा येथे १९८८ मध्ये परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून एक वर्ष, तर २०१२ ते २०१५ मध्ये त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्रात पुणे ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षकपदावर चांगली कामगिरी केली आहे. त्यांना या परिक्षेत्राची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांना काम करणेही सोपे जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार त्यांना कोल्हापूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे.

पुढीलआठवडाअखेरीसघेणारपदभार

नवे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पोलीस महासंचालकांनी येत्या दोन दिवसांत नांदेड येथून पदभार सोडण्यास सांगितले. ते कोल्हापूर परिक्षेत्राचा मंगळवारी (दि. ८) पदभार घेतील अन्यथा पुढील आठवड्याच्या अखेरीस पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीkolhapurकोल्हापूर