लिंगनूर-कापशीत मुश्रीफ-डाव्या आघाडीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:51+5:302021-01-22T04:21:51+5:30
कागलचे मावळते सभापती विश्वास कुराडे, ‘सदासाखर’चे संचालक शहाजी यादव, शाहू कृषीचे संचालक नानासाहेब घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक-राजे आघाडीची भक्कम ...

लिंगनूर-कापशीत मुश्रीफ-डाव्या आघाडीची सत्ता
कागलचे मावळते सभापती विश्वास कुराडे, ‘सदासाखर’चे संचालक शहाजी यादव, शाहू कृषीचे संचालक नानासाहेब घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक-राजे आघाडीची भक्कम बांधणी झाली; तर माजी सरपंच आवळेकर, दत्ता आवळेकर, गुंडा आवळेकर, आनंद पोवार, बाबू आवळेकर, प्रवीण जाधव, हरिदास पोवार, नामदेव भोसले, शिवाजी मेथे यांच्या नेतृत्वाखाली मुश्रीफ व माकपची आघाडी झाली.
मयूर आवळेकर यांनी गत पाच वर्षांत वेदगंगेतून चिकोत्रा नदीत पाणी योजना करून शाश्वत पाण्याची उपलब्धता, ब वर्ग पर्यटनमधून निधी, उपकेंद्र, आदी सुविधा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या कामाची पोहोच म्हणून स्वतःचेही मतदान नसणाऱ्या वॉर्डातून त्यांना तालुक्यात उच्चांकी २२८ मतांनी निवडून दिले.
आजोबँनंतर नातू...
जिल्हा परिषदेचे सदस्य कै. एम. बी. आवळेकर यांनी २० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता आणली होती. त्यानंतर नातू मयूर यांनी पुन्हा सत्ता आणत आजोबांच्या कार्याला उजाळा दिला.