जुन्या प्रियकाराच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:26 IST2021-03-25T19:24:33+5:302021-03-25T19:26:54+5:30

Court Crimenews Kolhapur- प्रेमसंबधास अडथळा ठरणार्या पहिल्या प्रियकाराचा खून करुन त्याचा काटा काढल्याप्रकरणी न्यायालयाने संतोष पुंडलिक कापसे (वय २४ रा. वाठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले) व दमयंती राजू यादव (वय ३० रा. इंदिरानगर, इचलकरंजी) यांना दोषी ठरवून जन्मठेपेची तसेच सात वर्षे कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Life imprisonment for both of them in the murder case of an old lover | जुन्या प्रियकाराच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

जुन्या प्रियकाराच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

ठळक मुद्देजुन्या प्रियकाराच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप सहा वर्षांनी निकाल : वाठार येथे प्रेमसंबधात ठरला अडथळा

कोल्हापूर : प्रेमसंबधास अडथळा ठरणार्या पहिल्या प्रियकाराचा खून करुन त्याचा काटा काढल्याप्रकरणी न्यायालयाने संतोष पुंडलिक कापसे (वय २४ रा. वाठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले) व दमयंती राजू यादव (वय ३० रा. इंदिरानगर, इचलकरंजी) यांना दोषी ठरवून जन्मठेपेची तसेच सात वर्षे कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश बी. डी. शेळके यांनी शिक्षा सुनावली. सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी काम पाहीले. जून २०१४ मध्ये वाठार येथे सुशांत मोरे याचा खून करून पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला होता. वडगाव पोलिसात हा गुन्हा नोद आहे.

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दमयंती यादव ह्या मृत सुशांत मोरे यांचे वडिल दत्ता मोरे यांच्याकडे कामास होती. तेंव्हा तिचे सुशांतसोबत प्रेम जुळले. दरम्यान, तेथील संतोष कापसे याने सातारा येथे हॉटेल व्यवसाय सुरु केला. तेथे दमयंती कामास गेल्या. यावेळी संतोष आणि दमयंती यांच्या प्रेमसंबंध जुळले.

हे सुशांतला समजले. त्यातून वाद होत होते. दि. २५ जून २०४ ला सुशांत हा कापसे राहात असलेल्या ठिकाणी आला. तेथे संतोष व दमयंती यानी प्रेमात अडथळा ठरणार्या सुशांतला बॅटने मारुन खून केला. मृतदेह किचन कट्ट्याखाली लपवला. गुन्ह्यात सापडण्याच्या भितीने दोघांनी सुशांतचा मृतदेह पोत्यात बांधून त्याच्याच दुचाकीवरुन निलेवाडी ते ऐतवडे रस्त्यावरील ऊसाच्या शेतात टाकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर ॲड. महाडेश्‍वर, ॲड. एस.एम.पाटील यांनी काम पाहिले. सतरा साक्षीदार तपासले. युक्तीवादानंतर न्यायाधिशांनी आरोपींना दोषी ठरविले. गुरुवारी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्यात ॲड. झेबा पठाण, ॲड. गजानन कोरे, सहाय्यक फौजदार एम.एम.नाईक, पैरवी अधिकारी मिलींद टेळी यांचे सहकार्य लाभले. तपास वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पो. नि. संजीव पाटील, उपनिरीक्षक गणेश वारोळे यांनी केला.


 

Web Title: Life imprisonment for both of them in the murder case of an old lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.