शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'मग आपण पहाटे जाऊन शपथ घेऊ', पाटील-मंडलिकांची रंगली कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 21:09 IST

आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पातील पाणी पूजन प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

कोल्हापूर/आजरा : राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार आहे तोपर्यंत खासदार संजय मंडलिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात, त्यानंतर ते आमच्यासोबत असतील असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी केले. यावर खासदार संजय मंडलिक यांनी असे झाले तर आपण पहाटे पाच वाजता जाऊन राज्यपालांकडून शपथ घेऊ असे प्रत्त्युत्तर दिल्यामुळे व्यासपीठावर एकच हास्याचे फवारे उडाले.आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पातील पाणी पूजन प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.       खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या मनोगतात उचंगीतील पाणीसाठ्याला कॉ. संजय तरडेकर यांचा संघर्ष, आमदार राजेश पाटील यांचा पाठपुरावा व हसन मुश्रीफ यांचे आशीर्वाद आहेत. पण सगळे प्रकल्प राष्ट्रवादीने नव्हे तर महाविकास आघाडी सरकारने निधी देवून पूर्ण केले आहेत असे सांगितले. यावर माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी दोन-तीन वेळा खासदार मंडलिक माझ्याकडे आले होते. तर आमदार राजेश पाटील यांनी उचंगीच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी दोन्ही पाहुण्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खासदार  मंडलिक राज्यात आताचे सरकार आहे तोपर्यंत शिंदे गटात राहतील त्यानंतर ते आमच्या सोबत असतील असे जयंतराव पाटील यांनी सांगताच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या व हास्यकल्लोळाला सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावरील खासदार मंडलिक यांनीही याला लगेच प्रत्युत्तर देत असे झाले तर आपण पाच वाजता जाऊन राज्यपालांकडे शपथ घेऊ असे सांगितले. त्यामुळे व्यासपीठावर व सभास्थळी हास्याचे फवारे उडाले. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीच खासदार मंडलिक यांच्या बद्दल या प्रकारे विधान केल्याने राष्ट्रवादीसह शिंदे गटांच्या कार्यकर्त्यात चर्चेला उधाण आले आहे.        यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, अभिजीत डोंगळे, भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, गंगाधर व्हसकोटी, सुधीर देसाई, संतोष पाटील,  जयसिंग चव्हाण, अभय देसाई, जनार्दन बामणे, अल्बर्ट डिसोझा, सुरेश कुराडे, जयवंत शिंपी, अभिषेक शिंपी, आप्पासाहेब गडकरी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरSanjay Mandalikसंजय मंडलिक