शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

यंदाचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साधेपणानेच, गुढी व भगवे ध्वज उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 4:37 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने घरासमोर गुढ्या, भगवे ध्वज उभारून साजरा करूया असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे. याविषयावर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देगुढी व भगवे ध्वज उभारून साजरा करुया शिवराज्याभिषेक दिन- मराठा महासंघाचे आवाहन : यंदाचा सोहळा साधेपणानेच

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने घरासमोर गुढ्या, भगवे ध्वज उभारून साजरा करूया असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे. याविषयावर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर हा निर्णय घेण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला होता. यानिमित्त रायगडावर मोठा सोहळा होतो. तर कोल्हापुरात पारंपारिक जल्लोषात मिरवणुकीसह विधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

मराठा महासंघाच्यावतीने गेल्या १३ वर्षांपासून हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र सध्या जगासमोर कोरोनाचे महासंकट असल्याने यंदाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या परिस्थितीत ''''अखंड सावधानता'''' हा शिवरायांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा गुणच कोरोनविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकण्याची स्फूर्ती देईल. तरी नागरिकांनी आपल्या घरावर गुढी व भगवे ध्वज उभारुन हा दिवस साजरा करावा असे आवाहन राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

या ऑनलाईन बैठकीस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, बबन रानगे, शाहीर दिलीप सावंत, प्रकाश पाटील, अशोक माळी, कादर मलबारी, उत्तम जाधव, इंद्रजीत माने, आनंद म्हाळूंगकर, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, के. एम. बागवान, उमेश पोर्लेकर, अवधूत पाटील, संजय कांबळे, शरद साळुंखे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग