महिलांनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:20+5:302021-01-22T04:21:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चेन स्नॅचिंग करणाऱ्यांचा सामना कसा करावा, मुली व महिलांवरील हल्ले कसे परतवून लावायचे, अशा ...

Lessons of self-defense taken by women | महिलांनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे

महिलांनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चेन स्नॅचिंग करणाऱ्यांचा सामना कसा करावा, मुली व महिलांवरील हल्ले कसे परतवून लावायचे, अशा एक ना अनेक हल्ल्यांना दमदारपणे कसे परतवावे, यासह स्वसंरक्षणाचे धडे कोल्हापूरकर महिलांनी घेतले, निमित्त होते ‘लोकमत’ सखी मंच व टशन से आयोजित या स्वसंरक्षण शिबिराचे.

कसबा बावड्यातील गंगा भाग्योदय हाॅलमध्ये १६ ते २० तारखेदरम्यान हे शिबिर झाले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर, जीएसटी विभागाच्या सहआयुक्त वैशाली काशीद, बाबा जांभळे उपस्थित होते.

शिबिरात चेन स्नॅचरकडून मंगळसूत्र खेचल्यानंतर कसे व कोणत्या पद्धतीने प्रत्युत्तर करायचे, याबद्दल महिलांना सहजरित्या अवगत होणारे तंत्र शिकवण्यात आले. यासह चोरी, अत्याचार करण्याच्या उद्देशाने होणारे हल्लेही कसे परतवून लावायचे, याबद्दलच्या ४० तंत्रांचे प्रशिक्षण यात देण्यात आले. कुडो हे जापनीज तंत्र असून हा मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. हे तंत्र सोप्या पध्दतीने महिलांना सहजरित्या आत्मसात करता यावे याकरिता ब्लॅकबेल्ट अमेझिंग मास्टर प्रशिक्षक अर्चना बराले व त्यांची कन्या ब्लॅकबेल्ट श्रुती बराले, श्रेया बराले यांनी हे प्रशिक्षण दिले.

झुम्बा एक्स्पर्ट शेफाली मेहता, योगा प्रशिक्षक गीतांजली ठोमके यांनी ध्यानधारणा, डॉ. शर्मिला देशमाने यांनी आहार कसा घ्यावा याबद्दल, ॲड. प्रिया पवार यांनी मानवी हक्कांची माहिती दिली. फिजिओथेरपिस्ट डाॅ. प्रांजली धामणे मेडिटेशनसाठी डॉ. सरोजिनी नेजदार यांनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना कुडो असोसिएशनतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. कुडो असोसिएशनचे अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे, शिवाजी घोलप, विश्वास बराले, धनराज वाडकर, धैर्यशील इंगवले यांच्या सहकार्याने प्रिया बासराणी, अलिशा भानुशाली, वारणा वडगावकर, मृण्मयी वडगावकर यांनी संयोजन केले.

--

फोटो नं २१०१२०२१-कोल-सखी मंच

ओळ :

‘लोकमत’ सखी मंच व टशन से च्यावतीने आयोजित स्वसंरक्षण शिबिराचा समारोप पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, जीएसटी विभागाच्या सह.आयुक्त वैशाली काशीद, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, बाबा जांभळे यांच्या उपस्थितीत झाला.

--

Web Title: Lessons of self-defense taken by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.