शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकांना डिझेल बचतीचे धडे

By admin | Updated: November 21, 2014 00:31 IST

‘सिम्युलेटर मशीन’वर प्रात्यक्षिक : जिल्ह्यातील प्रत्येक आगारात प्रशिक्षण

राम मगदूम - गडहिंग्लज --महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रत्येक बसचालकाला डिझेल बचतीचे धडे दिले जात आहेत. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न आणि त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च याचे गणित त्यांना समजावून सांगण्यात येत आहे. त्यासाठी कोल्हापूर विभागीय कार्यशाळेत खास मशीन बनविण्यात आले आहे. त्या मशीनचे नाव आहे ‘सिम्युलेटर मशीन’‘सिम्युलेटर मशीन’ हाताळण्याचे प्रशिक्षण सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारात हे मशीन बसवून चालकांना डिझेल बचतीचा मंत्र दिला जात आहे. सध्या गडहिंग्लज आगारात बसचालकांचे प्रशिक्षण सुरू आहे.सुरक्षित प्रवासासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांची वेगमर्यादा ७०, तर जवळच्या अंतराच्या गाड्यांची वेगमर्यादा ६५ ला लॉक करण्यात आली आहे. मात्र, डिझेलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. त्यामुळेच या मशीनद्वारे चालकांना प्रशिक्षित केले जात आहे. डिझेल बचतीसाठी गाडी एकाच गतीने चालवा, थांब्यावर जादावेळ थांबणार असला तर गाडी बंद करा, गिअर बदलताना डबल क्लचचा वापर करा, थांबा येण्यापूर्वी हळूहळू गती कमी करून गाडी थांबवा, एकदम गाडी थांबवू नका, अशा सूचना दिल्या जात आहेत. किती स्पीडला किती डिझेल लागते यासंबंधीची माहिती या मशीनवर प्रत्यक्ष कृतीद्वारे दिली जात आहे. कोल्हापूर, संभाजीनगर, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा, मलकापूर, इचलकरंजी व कुरुंदवाड या आगाराकडील सर्व चालकांच्या प्रशिक्षणासाठी हे मशीन टप्प्याटप्प्याने पाठविले जात आहे.सावधान..अभिनंदन..!डिझेलच्या योग्य वापरासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासात एका लिटरमध्ये ५ कि. मी., तर जवळच्या अंतराच्या प्रवासात एका लिटरमध्ये ४.८० कि. मी. अ‍ॅव्हरेज अपेक्षित आहे. याचे पालन करणाऱ्या चालकांची नावे सूचना फलकावर लिहून ‘अभिनंदन’ करण्यात येते. अपेक्षेपेक्षा अ‍ॅव्हरेज कमी असणाऱ्या चालकांची नावेदेखील त्याच फलकावर लिहून ‘सावधान’तेचा इशारा दिला जात आहे. या प्रशिक्षणामुळे सकारात्मक परिणाम दिसून येत असून सर्व चालक उत्स्फूर्तपणे प्रशिक्षण घेत आहेत.गडहिंग्लज आगारात डिझेल बचतीचे प्रशिक्षण घेताना बसचालक .