शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पुराचे पाणी झपाट्याने ओसरले; राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:03 IST

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दुधगंगा(काळम्मावाडी) धरण अखेर ७० टक्के भरले

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी काही काळ ऊन पडत होते. त्यामुळे श्रावणासारखा ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दुधगंगा धरण अखेर ७० टक्के भरले आहे. पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पुराचे पाणी झपाट्याने कमी होत असून, पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात साडेतीन फुटाने कमी झाली.गेल्या दोन-तीन दिवस जिल्ह्यात पाऊस कमी आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या; पण लगेचच आकाश मोकळे व्हायचे. दिवसभरात असेच वातावरण राहिले. अधूनमधून जोरदार सरी यायच्या मात्र, लगेच उघडीप व्हायची. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. येथे सरासरी ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गळतीसाठी उन्हाळ्यात दुधगंगा धरण मोकळे केले होते. त्यात जून महिना काेरडा गेल्याने धरण भरते की नाही, याविषयी कोल्हापूरकरांना काळजी होती. जुलै महिन्यात झालेल्या धुवाधार पावसाने धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत गेला. सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत दुधगंगा धरण ७० टक्के भरले होते. पाऊस कमी असल्याने पंचगंगा नदीचे पातळी दिवसभरात साडेतीन फुटाने कमी झाली. सध्या ३४.१० फुटावर पंचगंगा असून २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

पडझडीत ५० हजारांचे नुकसानजिल्ह्यात साेमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात ४ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुलेपावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. सद्या दोन धरवाजे खुले असल्याने स्वयंचलित दरवाजातून २८२८ क्युसेक तर पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक असा एकूण विसर्ग ४२२८ क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरDamधरण