शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाची उघडीप; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:54 IST

अद्याप ७७ बंधारे पाण्याखाली : राधानगरीतील विसर्गाने संथगतीने पाणी कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रात पाऊस असला तरी पुराची पातळी कमी होऊ लागली आहे. राधानगरीचे अद्याप दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पुराचे पाणी संथ गतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात १० इंचाने कमी झाली असून, दिवसभरात केवळ दोनच बंधारे मोकळे झाले आहेत. अद्याप ५३ मार्ग पाण्याखाली असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी सकाळपासून दोन-तीन जोरदार सरींचा अपवाद वगळता पूर्णपणे उघडीप दिली आहे. कोल्हापूर शहरात काही काळ ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाने उघडीप दिल्याने दिवसभरात कोल्हापूर शहरातील पुराचे पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याने काही रस्ते मोकळे झाले होते. जिल्ह्यात राज्य व प्रमुख जिल्हा असे ५३ मार्ग बंद होते. असे असले तरी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरुवात झाल्याने दूध व भाजीपाल्याची आवक-जावक सुरु झाली आहे.धरण क्षेत्रात पाऊस असला तरी त्याचा जोर कमी आहे. राधानगरी धरणाच्या दोन दरवाज्यातून प्रतिसेकंद ४३५६ घनफूट, दूधगंगेतून ८१०० तर वारणा धरणातून १६ हजार ९७६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. सोमवारी सकाळी पंचगंगा नदीची पातळी ४६.४ फूट होती, रात्री पर्यंत ती ४५.६ फुटापर्यंत खाली आली होती.

पडझड सुरूच..गेली आठ दिवस जिल्ह्यात पावसामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढत आहे. रोज सरासरी २०० पेक्षा अधिक घरांची पडझड होत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात २२६ खासगी मालमत्तांची पडझड होऊन त्यात ६१ लाख ६६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.एसटीचे ६६२ फेऱ्या रद्दमहापुराच्या पाण्याचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. सोमवारी तब्बल ६६२ फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे ६ लाख ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.बालिंगा पुलावरून दुचाकीची वाहतूककोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाशेजारील पाणी उतरले आहे. पण, पुलाच्या सुरक्षिततेच्या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतूक बंद केली होती. सोमवारी सायंकाळपासून दुचाकीची वाहतूक सुरु झाली आहे.

  • पंचगंगेच्या पातळीत घसरण : १० इंचाने
  • सध्याची पातळी : ४४.७ फूट
  • बंधारे पाण्याखाली : ७७
  • मार्ग बंद : ५३
  • नुकसान : २२६ मालमत्ता
  • नुकसानीची रक्कम : ६१ लाख ६६ हजार

हे मार्ग अद्याप ठप्पचकोल्हापूर ते मलकापूरकाेल्हापूर ते गगनबावडा (बालिंगा येथून दुचाकी वाहतूक सुरु)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर