कोल्हापूर शहरात घुसलेला बिबट्या जेरबंद, हल्ल्यात एकजण जखमी -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:00 IST2025-11-11T12:59:51+5:302025-11-11T13:00:57+5:30
शहरात एकच खळबळ उडाली

कोल्हापूर शहरात घुसलेला बिबट्या जेरबंद, हल्ल्यात एकजण जखमी -video
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात भरवस्तीत बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. ताराबाई पार्क परिसरात घुसलेल्या या बिबट्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यात पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.
अखेर वनकर्मचाऱ्यांनी या बिबट्याला जेरंबद केले. गुंगीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेण्यात आले. यामुळे सर्व यंत्रणेबरोबरच नागरिकांनीही सुटकेचा निश्वास घेतला.
ताराबाई पार्क परिसरातील एका हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेत बिबट्याने त्याठिकाणी काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यानंतर याच ठिकाणी असलेल्या महावितरणच्या कार्यालयात एका चेंबरमध्ये बिबट्या लपून बसला. बिबट्या नेमका कुठून आला याबाबत संभ्रम आहे.
गेल्या काही दिवसापासून नागरिकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पन्हाळा, जोतिबा, सादळे मादळे यासह परिसरात अनेकदा बिबट्याचा वावर असल्याने दिसून आले आहे. मात्र आज, शहरातच बिबट्या घुसल्याने एकच गोंधळ उडाला.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, वाहतूक नियंत्रण आणि महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.