शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

कोल्हापुरात काम बंद ठेवून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा वकिलांनी केला निषेध, दोषी वकिलास शिक्षेची एकमुखी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:22 IST

पाचशेवर खटल्याचे कामकाज ठप्प :

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हे राज्य घटनेवरील हल्ल्याचे षडयंत्र आहे. याची सखोल चौकशी करून दोषी वकिलास आणि घटनेमागील सूत्रधारांना शिक्षा व्हावी, अशी मागणी जिल्हा बार असोसिएशनच्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील वकिलांच्या निषेध सभेत करण्यात आला. जिल्हा न्यायालयात कामकाजापासून अलिप्त राहून वकिलांनी निषेध नोंदवला. कामकाजापासून वकील अलिप्त राहिल्याने जिल्हा न्यायालयात सुमारे ५०० खटल्यांचे कामकाज होऊ शकले नाही.सरन्यायाधीश गवई यांच्यावर सोमवारी एका वकिलाने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा बार असोसिएशनची निषेध सभा झाली. जिल्हा न्याय संकुलाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या सभेत सेवानिवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी तीन ठराव मांडले. हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध, सनातनी प्रवृत्तीचा निषेध आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीच्या ठरावांना उपस्थितांनी मंजुरी दिली. आगामी तीन दिवस लाल फिती लावून काम करण्याचा निर्णय झाला.यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस, अजित मोहिते, समीउल्ला पाटील, किरण पाटील, रणजीत गावडे, सर्जेराव खोत, शिवाजीराव राणे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्वांनी बाहेर येऊन निषेधाच्या घोषणा दिल्या.सर्किट बेंचमध्येही निषेध सभासरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाबद्दल सर्किट बेंचच्या बार रूममध्ये वकिलांची निषेध सभा झाली. वकिलांनी घटनेचा निषेध नोंदवून दोषींवर कारवाई मागणी केली. मात्र, हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा, की सनातनी विचारांचा निषेध करावा यावरून वकिलांमध्ये मतभेद झाला. अखेर ज्येष्ठ वकिलांनी यात मध्यस्थी केल्याने हल्लेखोराच्या सनातनी प्रवृत्तीचा निषेध करण्यावर एकमत झाले.पोलिसांत तक्रार देणारलोकशाही वाचविण्यासाठी निषेध सभेत ॲक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. कमिटीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांची सर्वानुमते निवड झाली असून, हल्लेखोराच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकशाहीवर घाला घालणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात कोल्हापुरातून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Lawyers Protest Attack on Chief Justice, Demand Strict Punishment

Web Summary : Kolhapur lawyers boycotted work, protesting the attack on Chief Justice Gavai. They demanded strict punishment for the lawyer involved and those behind the conspiracy, viewing it as an attack on the constitution. A committee was formed to file a police complaint.