शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 14:06 IST

वकील गुणरत्न सदावर्ते नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात.

कोल्हापूर: वकील गुणरत्न सदावर्ते नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. ते सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आणि शरद पवार यांच्यावर टीका करतात. आता पुन्हा एकदा त्यांनी पवारांवर टीका केली असून राष्ट्रवादी हा कौटुंबिक पक्ष असल्याचे म्हटले आहे. "शरद पवार वैचारिक व्हायरस असून त्याला निर्जंतुक करणे यासाठी एस टी को ऑप बँक निवडणुकीत उतरलो आहे. शरद पवार यांची सत्ता बाजूला करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. पवार यांनी चालक-वाहक यांना कधी उमेदवारी दिली नाही", असे सदावर्तेंनी नमूद केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

दरम्यान, आम्ही कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी एस टी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीत उतरलो आहोत. ३३ हजार मराठा आज आमच्यासोबत आहे. आम्ही सर्वाधिक उमेदवार दिले आहेत. कोल्हापूरमध्ये जे आम्ही पाहिलं, काही हिंदू तरुण लांबून पाहत होते त्यांची गुन्ह्यात नावं आली आहेत. याबाबत मी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. हसन मुश्रीफ यांचे देखील आम्ही काही चालू देणार नाही. पहिल्यांदा ही भूमिका आम्ही घेतली आहे. लव्ह जिहादच्या संदर्भाने मुंबईत आम्ही सगळ्यात मोठा मोर्चा काढला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  "लादलेले विचार स्वीकारू शकत नाही""लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर व्हॉट्सअप जिहाद सुरू झालं आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणार असून पोलीस यंत्रणेला देखील याबाबत पत्रव्यवहार करणार आहे. सर्वच ग्रुप चुकीचे वागत नाहीत. लादलेले विचार आम्ही स्वीकारू शकत नाही. तसेच संजय राऊत यांच्यासारखी पत्रकारिता पाहिली नाही", असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवारांवर टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना सदावर्तेंनी म्हटले, "राष्ट्रवादी काँग्रेस हा कौटुंबिक पक्ष असून दोन ते तीन जिल्ह्यापुरता राहिला आहे. म्हणून हा पक्ष देखील संपून जाईल. त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील." 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSanjay Rautसंजय राऊतkolhapurकोल्हापूर