शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत एज्युकेशनल फेअर’चा आज प्रारंभ -- करिअरविषयक माहिती एकाच छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:05 IST

‘तुमचे यश हेच आमचे ध्येय’ हे ब्रीद घेऊन यावर्षी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केले आहे. त्यामध्ये विविध करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे. कोल्हापुरात आज, शनिवार ते सोमवार (दि. १०) पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे.

ठळक मुद्दे डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये तीन दिवस प्रदर्शन

कोल्हापूर : ‘तुमचे यश हेच आमचे ध्येय’ हे ब्रीद घेऊन यावर्षी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केले आहे. त्यामध्ये विविध करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे. कोल्हापुरात आज, शनिवार ते सोमवार (दि. १०) पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे. त्यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच विविध बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे होणाऱ्या या प्रदर्शनास ‘द युनिक अकॅडमी, पुणे’चे प्रायोजकत्व, तर अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. बँकिंग पार्टनर म्हणून ‘एसबीआय’ आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन आज, शनिवारी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मा. प्रविण बगे (द युनिक अकॅडमी, पुणे), मा. डॉ. अरुण पाटील (कुलगुरू, अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, जयपूर, राजस्थान) चंद्रकांत नौकुडकर (चीफ मॅनेजर, आर. बी. ओ., कोल्हापूर) प्रमुख उपस्थित असणार आहेत. या प्रदर्शनात शैक्षणिक संस्थांच्या माहितीसह मुलांच्या व्यक्तिमत्त्व कौशल्याचा विकास, बुद्धिमत्ता विकासाला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. त्यात आज, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता रोबोटिक वर्कशॉप होणार असून, सुधीर पाटील मार्गदर्शन करणार आहेत. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवरील ‘कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल’ स्पर्धा उद्या, रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे. विज्ञानावर आधारित असलेली ‘सायन्स पंडित’ स्पर्धा सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता होणार आहे. या स्पर्धांमध्ये हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ‘टेराकोटा जर्नी’ या विषयावर गौरव कार्इंगडे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनात सहभागी शैक्षणिक संस्था या विद्यार्थी, पालक यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून, त्यांना माहिती देणार आहेत.

रोबो, कॅलिग्राफी, पॉट मेकिंगची संधीप्रदर्शनातून तंत्र , टेराकोटा पॉट मेकिंग आदी कौशल्य विकासाची संधी उपलब्ध होणार आहे. चला रोबो बनवुया याअंतर्गत रोबोचे प्रकार, त्यांचे सुटे भाग, आदींच्या माहितीसह रोबो बनविण्याचे प्रात्यक्षिक होणार आहे.ज्ञानातून सक्षमीकरण करणारी ‘द युनिक अकॅडमी’या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘द युनिक अकॅडमी’ आहे. ‘ज्ञानातून सक्षमीकरण’ हे ब्रीदवाक्य घेऊन द युनिक अकॅडमीची स्थापना झाली आहे. अकॅडमीतर्फे यूपीएससी व एमपीएससी या परीक्षांसाठी इंटिग्रेटेड, वैकल्पिक विषय, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी माध्यमांतून कोर्सेस चालविले जातात. त्याचबरोबर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयएएस फाउंडेशन कोर्सही चालविले जातात. पदवी काळातच विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’ची तयारी करता यावी, यासाठी अकॅडमीतर्फे थ्री इयर्स इंटिग्रेटेड बॅचही सुरू आहे. यासह अकॅडमीतील व अकॅडमीबाहेरील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी व एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या टेस्ट सीरिज घेतल्या जातात. 

पुणे हे मुख्य केंद्र असून, महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या ठिकाणी शाखा सुरू आहेत. सातारा, कºहाड, इस्लामपूर येथे शाखा आहेत. स्थापनेपासून या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन १0 हजार विद्यार्थी अधिकारी झाले आहेत. काही ठिकाणी निवासी वर्गाची सोय उपलब्ध आहे.चांदीचे नाणे, सेल्फी स्टिक मिळवाया प्रदर्शनातील सेमिनारमध्ये सहभागी होणाºया प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला सेल्फी स्टिक मिळणार आहे. त्यासह प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्येक तासाला चांदीचे नाणे जिंकण्याची संधी आहे. भेट देणाºया विद्यार्थ्यांकडून लकी ड्रॉसाठी कूपन भरून घेतले जाणार आहे. त्यातील विजेत्याला बक्षीस म्हणून टॅब्लेट मिळणार आहे.आज, शनिवारीदुपारी ४ वाजता : इम्पॉर्टन्स आॅफ इंग्लिश (मार्गदर्शक : राजीव नाईक)सायंकाळी ५ वाजता : करिअर : एक चिंतन (चारूदत्त रणदिवे)सायंकाळी ६.३० रोबोटिक वर्कशॉप - मार्गदर्शक : सुधीर पाटीलप्रदर्शनात रविवारी (दि. ९) होणारे कार्यक्रमस.१० वाजता : कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल स्पर्धासकाळी ११ वाजता : एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत सेमिनार (प्रवीण बगे)दुपारी १२ वाजता : करिअर प्लॅनिंग (प्रसाद कुलकर्णी)दुपारी ४ वाजता : परदेशातील शैक्षणिक संधी (कुणाल पाटील)सायंकाळी ५ वाजता : दहावीनंतर करिअर निवडताना (डॉ. विराट गिरी)सोमवारी (दि. १०)सकाळी ११ वाजता : सायन्स आणि मॅथ्स पंडित स्पर्धादुपारी १२ वाजता : दहावीतून पुढील शिक्षणाकडे जाताना सेमिनार (प्रा. भारत खराटे)दुपारी ४ वाजता : करिअरच्या संधी (डॉ. डी. एन. मुदगल)सायंकाळी ५ वाजता : एसबीआय ठेव योजना आणि इतर (चंद्रकांत नौकूडकर)

 

टॅग्स :Educationशिक्षणupscकेंद्रीय लोकसेवा आयोगMPSC examएमपीएससी परीक्षा