शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 11:53 IST

तुमच्यासाठी गेल्यावेळी जीवाचे रान केले, तुमचे कर्तृत्व काय?

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : गेल्या निवडणूकीत शाहू छत्रपतींच्या पाया पडायला राजवाडयात का गेला होता? माझ्याकडे तो फोटोही आहे, तो व्हायरल करू का? तुमच्यासाठी गेल्यावेळी जीवाचे रान केले. ५ वर्षे तुम्ही काय केले? तुमचे कर्तृत्व काय? असा सवाल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांना विचारला.महागाव (ता.गडहिंग्लज) येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अप्पी पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हयाची अस्मिता,स्वाभिमान आणि आपल्या कृतीतून देशाला समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षि शाहू महाराज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.सतेज पाटील म्हणाले, 'करवीरच्या गादी'ची पुण्याई मोठी आहे, कोल्हापूर जिल्हयावर गादीचे अनंत उपकार आहेत.त्यामुळे गादीचा सन्मान राखा, गादीवर बोलू नका. हवे तर माझ्यावर बोला, मी उत्तर द्यायला समर्थ आहे, असे खासदार संजय मंडलिक यांना सांगितले होते. तरिही त्यांनी गादीचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, मी राजकारणात कसलेला पैलवान आहे. शडडू ठोकलाय, माती अंगावर घेतली आहे, चितपट केल्याशिवाय राहणार नाही.अप्पी पाटील यांनी आतापर्यंत स्वतःसाठी ताकद दाखवली होती. परंतु, भरदुपारच्या उन्हात विराट मेळावा घेऊन त्यांनी शाहु छत्रपती यांच्यासाठी आपली ताकद दाखवली. महिनाभरातील गडहिंग्लज विभागातील हा सर्वात मोठा मेळावा आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी मेळाव्याचे संयोजक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचे कौतुक केले.शाहू छत्रपती म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात जनसंघ, भाजप कुठे होता? 'काँग्रेस'नेच देशाला स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान दिले. 'इंडिया आघाडी'च ते टिकवेल. निवडणुकीतील वातावरण कितीही तापले तरी काही फरक पडणार नाही.यावेळी गोपाळराव पाटील, किसनराव कुराडे,अप्पी पाटील, सुनील शिंत्रे, डॉ. नंदिनी बाभुळकर, स्वाती कोरी, दिलीप माने रामराज कुपेकर, अभिषेक शिंपी, गिरीजादेवी शिंदे - नेसरीकर, अखलाक मुजावर, यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास  डॉ.संजय चव्हाण, हणमंतराव पाटील, इंद्रजीत पाटील, अमर चव्हाण, संभाजीराव देसाई-शिरोलीकर, शिवाजी खोत आदी उपस्थित होते. कॉ.संजय तर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. सरपंच प्रशांत शिंदे यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील