भरदिवसा मोटारीतून लॅपटॉप, प्रोजेक्टरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:32 IST2020-03-05T19:30:23+5:302020-03-05T19:32:37+5:30

ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर यादरम्यान रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीतून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, एलसीडी प्रोजेक्टर आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत प्रकाश रामचंद्र राऊत (रा. विश्वरूप अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर. सध्या रा. पुणे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

Laptops, projectors stolen from a motor vehicle | भरदिवसा मोटारीतून लॅपटॉप, प्रोजेक्टरची चोरी

भरदिवसा मोटारीतून लॅपटॉप, प्रोजेक्टरची चोरी

ठळक मुद्देभरदिवसा मोटारीतून लॅपटॉप, प्रोजेक्टरची चोरीदाभोळकर चौकातून घटना : पन्नास हजारांचा मुद्देमाल गायब

कोल्हापूर : ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर यादरम्यान रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीतून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, एलसीडी प्रोजेक्टर आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत प्रकाश रामचंद्र राऊत (रा. विश्वरूप अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर. सध्या रा. पुणे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश राऊत हे शेती औषध कंपनीत नोकरीस आहेत. त्यामुळे ते गेली चार वर्षे पुणे येथे राहत आहेत. ते मंगळवारी (दि. ३ मार्च) कंपनीच्या कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. दिवसभराचे काम संपवून सायंकाळी त्यांनी दाभोळकर कॉर्नर परिसरात रस्त्याकडेला मोटार पार्क केली व परिसरातील औषध दुकानात पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले होते.

त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारीतील निळ्या पिशवीतील लॅपटॉप, काळ्या बॅगमधील एलसीडी प्रोजेक्टर तसेच आधारकार्ड, हार्डडिस्क, बँकांची पासबुके, कंपनीची कागदपत्रे आदी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. राऊत हे पाण्याची बाटली घेऊन परतले असता त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.
 

 

Web Title: Laptops, projectors stolen from a motor vehicle