कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरील करूळ घाटात दरड कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:21 IST2025-07-28T12:20:42+5:302025-07-28T12:21:31+5:30
प्रशासनाने वाहनचालकांना काळजीपूर्वक व सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याचे आवाहन केले

कोल्हापूर-वैभववाडी मार्गावरील करूळ घाटात दरड कोसळली
गगनबावडा : कोल्हापूर- वैभववाडी मार्गावरील करूळ घाटात पावसामुळे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गगनबावडापासून दीड कि.मी. अंतरावर एका वळणावर खडकाचा मोठा भाग रस्त्यावर आल्याने काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच ठेकेदार आर. बी. वेल्हाळ कन्स्ट्रक्शन यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अवजड खडक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. गगनबावडा पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घेतली.
दरम्यान, घाटात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे करूळ घाटात अशा प्रकारच्या दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात, त्यामुळे प्रशासनाने वाहनचालकांना काळजीपूर्वक व सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.