शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri-Nagpur Highway: मोजणीला आल्यास ड्रोनला मातीत गाडणार, महामार्ग कृती समितीचा भूमी अभिलेखला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:21 IST

शिरोळ : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाधित दहा गावांतील राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने ड्रोनद्वारे जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. ...

शिरोळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाधित दहा गावांतील राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने ड्रोनद्वारे जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाईसह विविध मागण्या मान्य होण्यापूर्वी जमिनीच्या भूसंपादनासाठी सरकारने चुकीच्या पद्धतीने ड्रोनद्वारे कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही. मोजणीचे ड्रोन मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही व ही मोजणी रद्द करा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने शिरोळ भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक पल्लवी उगले यांना देण्यात आले.बाधित दहा गावांच्या मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून तीव्र लढा उभारला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय प्राधिकरण यांच्याकडे शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत चौपट भरपाईचा अद्यादेश निघत नाही तोपर्यंत येथील मोजणी करायची नाही असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला दिले होते. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने भूमी अभिलेख विभागाला वेठीस धरून माहीत नसलेल्या ड्रोन कंपनीद्वारे मोजणीचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विक्रांत पाटील, सुधाकर पाटील, कीर्तीकुमार सावळवाडे, मिलिंद मगदूम, रावसाहेब कांबळे, प्रकाश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, अविनाश कोडोले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.