शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत विकासकामे कमी; श्रेयवाद जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहराच्या विकासात गेल्या दहा वर्षांत राजकीय कुरघोड्या सुरू झाल्याने शहराची प्रगती खुंटली ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहराच्या विकासात गेल्या दहा वर्षांत राजकीय कुरघोड्या सुरू झाल्याने शहराची प्रगती खुंटली आहे. एखादे विकासकाम झाले अथवा मंजुरी मिळाली की, त्यावर श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते तुटून पडण्याची पद्धत आली आहे. त्याचबरोबर गरज पडल्यास मंजूर झालेल्या कामाला 'खो' घालण्यासही मागे-पुढे पाहिले जात नाही. अशा कुरघोड्यांच्या राजकारणाऐवजी शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दहा वर्षांपूर्वी शहरातील राजकारण एका प्रवाहानुसार वाहत होते. परिणामी शहराची झपाट्याने प्रगती झाली. शहरातील प्रमुख व्यवसाय वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी तत्कालीन राजकीय नेत्यांनी चांगले प्रयत्न केले. तसेच विविध योजना, सवलती मिळाल्याने वस्त्रोद्योगाला चालना मिळाली. हातमागापासून सुरू झालेला वस्त्रोद्योग अत्याधुनिक यंत्रमागापर्यंत पोहचला आहे. त्याच्याशी संलग्न सर्वच व्यवसाय जोमाने वाढले.

परंतु गत दहा-पंधरा वर्षांत वाढलेली महागाई व त्याबरोबर निर्माण झालेली वस्त्रोद्योगातील मंदी या कारणांमुळे शहरातील वस्त्रोद्योगाची वाताहत झाली. त्यात अत्याधुनिक यंत्रमाग व साधे यंत्रमाग यातील तफावत सहजपणे दूर न होणारी असल्याने साध्या यंत्रमागधारकांचे अधिकच नुकसान झाले. शासनाने वस्त्रोद्योगासाठीच्या अनेक सवलती बंद केल्या अथवा कमी केल्या, या सर्वांचा विपरीत परिणाम वस्त्रोद्योगावर तसेच शहराच्या प्रगतीवर होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालल्याचे चित्र आहे.

त्यातूनही एखादी योजना मंजूर झाल्यास त्याचे श्रेय घेण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्षांचे सर्व प्रमुख नेते पुढे येतात. मंजूर झालेल्या विकासकामासाठी आपण किती दिवसांपासून पाठपुरावा करतो, त्याच्या पत्रांसह माहिती देतात. काम होण्यासाठी सर्वच नेते आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे प्रयत्न करीत असतात. शहराच्या विकासासाठी नेत्यांचे ते कर्तव्यच आहे, याचा त्यांना विसर पडतो की काय, असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो.

चौकटी

महाविकास आघाडीतील कुरघोड्या

विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष अंतर्गत कुरघोड्या करून आमच्याच पक्षाच्या नेत्याने हे काम करण्यासाठी किती धडपड केली, याची टिप्पणी करत बसतात. याउलट त्यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या सरकारने हे काम केले, असा संयुक्त दाखला देणे अपेक्षित आहे.

टीका करणारे हेच

एखादे विकासकाम प्रलंबित पडले अथवा ते झाले नाही, तर एकमेकांवर टीका करण्यासाठीही हेच नेते पुढे असतात. काम कसे झाले नाही, याचे दाखले देतात.

'खो' घालण्याचा प्रकार

शहरातील आरटीओ कार्यालय 'एमएच ५०' मंजूर झालेले राजकीय कुरघोड्यांमुळे बारगळले. आयजीएम रुग्णालयातील कर्मचा-यांच्या भरतीसह विविध प्रलंबित कामे राजकीय कुरघोड्यांमुळे प्रलंबित, त्याचबरोबर ब्रेक टेस्ट ट्रॅक, भुयारी गटार योजना अशी अनेक उदाहरणे आहेत. एखाद्याने चांगले काम केले, असे त्याला श्रेय मिळू नये, याची खबरदारी घेत त्याला पद्धतशीरपणे 'खो' घालण्याचा प्रकार केला जातो. ही बाब शहराच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि गंभीर आहे.