शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराचा खून, दोन महिन्यांनंतर झाला खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:09 IST

पन्हाळ्यातील कणेरीच्या जंगलात सापडला होता मृतदेह

आसुर्ले-पोर्ले : काम दिल्यानंतर कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराला परत आणून कोल्हापूर बसस्थानकावर दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत प्रशांत पांडुरंग कसबले (वय ३५, रा. देसाईवाडी, ता. चंदगड) या मजुराचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर चौघा जणांनी मजुराच्या मृतदेहाची विल्हेवाट पन्हाळा तालुक्यातील कणेरीच्या जंगलात लावली. दोन महिन्यांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या खिशात असणाऱ्या चिठ्ठीवरून पन्हाळा पोलिसांनी खुनाचा उलघडा केला. पन्हाळा पोलिसांनी चारही आरोपींना मंगळवारी (दि. १९) ताब्यात घेऊन अटक केली आहे. सागर धुळप्पा बंडगर (वय ३८ वर्षे, मातंग गल्ली, रा. खेबवडे, ता. करवीर), शुभम खानू मेटकर (वय २४, रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर), कृष्णात शिंगाप्या धनगर (वय ४६), गोरख शिंगप्पा धनगर (वय ५२, दोघे जण, रा. धनगर गल्ली, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत.२२ जानेवारी रोजी पन्हाळा पोलिसांना कणेरीच्या जंगलात अर्धवट सडलेल्या स्थितीत अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या खिशात मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी सापडली होती. यावरून मोबाइल दुकानामध्ये मृत व्यक्तीचा मोबाइल दुरुस्तीला टाकल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, कसबले यांनी दुकानदाराच्या मोबाइलवरून त्याच्या मित्रास फोन केला होता. याबाबत प्रशांत यांच्या मित्राकडे पोलिस समीर मुल्ला यांनी चौकशी केली असता ते गावातून कामासाठी कोल्हापूरला गेल्याचे समजले.कोल्हापूर बसस्थानकावर बाहेरून मजुरीस येणाऱ्यांबाबत चौकशी केली असता मजूर पुरविणाऱ्या सागर बनगरची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय, कसबले यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण खेबवडे दाखवत होते. आरोपी सागरकडे कसबले यांच्याबाबत चौकशी केली असता बकरी राखण्याचे काम देतो, असे सांगून कसबलेंना सागरने खेबवडेला नेले होते. तीन दिवस गावात ठेवले. त्यानंतर तीन दिवस महे येथील आरोपी शुभम मेटकर याच्याकडे कामाला ठेवले होते. तेथे त्रास झाल्याने पळून जाणाऱ्या कसबलेंना शुभमने बसस्थानकावरून परत आणले. पळून गेल्याच्या रागातून शुभमने लाकडी दांडका व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यानंतर खेबवडे येथे नेऊन कसबले यांना पुन्हा सागर आणि शुभमने दांडक्यांनी मारहाण केली.सागर आणि शुभमने कसबले यांना जखमी अवस्थेत आडूर (ता. करवीर) येथील गोरख आणि कृष्णात धनगर यांच्याकडे कामाला पाठविले. जखमी अवस्थेत असलेले कसबले यांचा मृत्यू उपचार न केल्यामुळे झाला. ही गोष्ट सागरला सांगितल्यावर त्यांनी हात वर केले.प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून आरोपी कृष्णात गोरख धनगर यांनी परस्पर मृतदेहाची कणेरीच्या जंगलात विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक आप्पासाहेब पोवार, पोलिस निरीक्षक संजय बोंबले, पोलिस निरीक्षक महेश कोंडुभैरी, पोलिस हवालदार समीर मुल्ला, पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष वायदंडे, रवींद्र कांबळे यांनी तपास केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस