शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कुपेकर, मिणचेकर, पी. एन., कोरे यांची प्रतिष्ठा

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

गावांचे राजकारण : सत्तेसाठी सरसावले मातब्बर; ‘आर या पार’ची लढाई

राजाराम लोंढे - कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाबरोबर जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींची गावातील सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे कानडेवाडी, आमदार सुजित मिणचेकर यांचे मिणचे, माजी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार संपतराव पवार यांचे सडोली खालसा, माजी मंत्री विनय कोरे व माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे कोडोलीच्या सत्तेसाठी सरसावले आहेत. ग्रामपंचायत ही राजकारणाचा पाया मानला जातो. ज्याची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता त्याची तालुका पातळीवरील राजकारणात चलती असते. त्यामुळे नेतेमंडळी राजकारणात कितीही उच्चपदावर पोहोचली, तरी त्यांना गावातील सत्ता महत्त्वाची वाटत असते. सध्या जिल्ह्यातील सुमारे चारशे ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांच्या गावातील निवडणुकाही लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आमदार संध्यादेवी कुपेकर यांची कानडेवाडीची निवडणूक रंगतदारपणे सुरू आहे. येथे थेट कुपेकर कुटुंबातच पुन्हा सामना आहे. ग्रामपंचायत लहान असली तरी सत्तेत प्रतिष्ठा असल्याने दोन्ही गटांनी ताकद पणाला लावली आहे. माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या चन्नेकुप्पीमध्ये स्थानिक आघाडीने आव्हान दिले आहे. नूलमध्ये माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या आघाडीसमोर सेना-भाजपचे आव्हान आहे. डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या कौलगेतही सत्तेसाठी ‘आर या पार’ची लढाई सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वेतवडे ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत होत आहे. येथे जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे व माजी सभापती गुंडा कांबळे यांच्यातच सरळ सामना आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रिया वरेकर यांचीही गगनबावडा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यात लक्षवेधी असलेल्या कोडोली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे व माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्यात अस्तित्वाची लढाई होत आहे. पोर्लेमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश पाटील व बाजार समितीचे संचालक परशराम खुडे यांच्यात