शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकचा कुडची पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:18 AM

अत्यावश्यक सेवा घरपोहोच आदींच्या माध्यमातून कुडची नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने आपले स्वत:चे मॉडेलच विकसित केले आहे.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात भिलवाडा पॅटर्नचा बोलबाला असला, तरी बेळगाव जिल्ह्यातील कुडची हे शहर ज्या पद्धतीने कोरोनाशी लढा देत आहे. तो कर्नाटकात कुडची पॅटर्न म्हणून लोकप्रिय होत आहे; यासाठी शहरातील रस्त्यांसह सर्व घरांचे आतून बाहेरून सॅनिटाईझिंग, शहरवासीयांचे तीनवेळा थर्मल टेस्टिंग, तसेच बाहेरच्या माणसांना प्रवेशबंदी, शंभर टक्के लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा घरपोहोच आदींच्या माध्यमातून कुडची नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने आपले स्वत:चे मॉडेलच विकसित केले आहे.या मॉडेलच्या आधारेच कोरोनाचे १९ रुग्ण सापडून देखील त्याचे समाजात संक्रमण होण्यापासून रोखण्यात शहराने यश मिळविले आहे. नगरपंचायत, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने हातात हात घालून काम केल्यानेच हे साध्य झाले आहे.सांगलीपासून रस्त्याने ४९ आणि रेल्वेने ४० किलोमीटरवर कृष्णा नदीकाठी कुडची हे शहर वसलेले आहे. लोकसंख्या सुमारे ५५ हजार लोकसंख्या आणि मुस्लीमबहुल असलेले हे शहररेल्वे मार्गाने जोडलेले असल्यामुळे महाराष्टÑातील मिरज, सांगलीसह अन्य शहरांशीही कुडचीवासीयांचा नित्य संपर्क येत असतो. फेब्रुवारीत दिल्लीत झालेल्या तबलिगीच्या मरकजला कुडचीतीलही पंधराजण गेले होते. हे समजताच त्यांना एक एप्रिलला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. यातील चौघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल ६ फेब्रुवारी रोजी आला. यामुळे शहरात भीतीची छाया पसरली. नगरपंचायत, ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचारविनिमय करुन निर्णय घेण्यात आले. उपाययोजना चालू झाल्या. दरम्यान ज्या चौघांना कोरोना झाला होता. त्या दोन कुटुंबीयांशी संबंधित लोकांनाही त्याची लागण होऊ लागली. हा आकडा आजअखेर १९ वर गेला आहे. यातील चौघेजण आता कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरितांची प्रकृतीही सुधारत आहे.घरपोहोच सेवाशहर १00 टक्के बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्या अंमलबजावणीसाठी तरुण स्वयंसेवकांच्या तुकड्या तयार करण्यात आल्या. शहरात २३ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली १० तरुणांची फौज देण्यात आली. शहरातील दुकानदारांचे तसेच या तरुणांचे मोबाईल नंबर प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. जे हवे ते त्यांनी दुकानदार अथवा स्वयंसेवकांना सांगायचे. त्यांनी काही तासांतच ते घरपोहोच करायचे, अशी पद्धत चालू करण्यात आली; त्यामुळे सामाजिक संसर्ग टाळण्यात यश आले.गरिबांना मोफत दूधगरीब कुटुंबांना शासनाने मोफत तांदूळ, गहू तर दिलेच; पण कर्नाटक सरकारने या कुटुंबांना दररोज एक लिटर दूध घरपोहोच देण्याची योजना सुरू केली. या योजनेचा फायदाही नागरिकांना झाला आहे.पंधराशेहून अधिक जणांचे स्वॅबशहरातील कोरोनाची लक्षणे आढळलेले तसेच बाधितांच्या संपर्कातील दीड हजाराहून अधिक जणांचे स्वॅब घेऊन त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सर्व नागरिकांची चाचणी करण्यासाठी सध्या दररोज ३०० हून अधिक जणांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.नगरपालिका अन् ग्रामपंचायतहीकुडची याच नावाची नगरपालिका आणि ग्रामपंचायत एकाच ठिकाणी कशी? असा प्रश्न कोणालाही पडेल. पण हे खरे आहे.कुडची शहरालगतच्या सुमारे १० किलीमीटरचा परिघ कुडची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत ४१ सदस्य आहेत.> एकच प्रवेश मार्गकोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सुरुवातीला लॉकडाऊन होतेच; पण कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांनाही त्याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होताच १६ एप्रिलपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. शहरात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. कर्नाटक सर्कल या चौकातूनच फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवेश देण्यात येत आहे.>तीनदा थर्मल टेस्टशहरात रुग्ण आढळल्यापासून घराघरांत जाऊन प्रत्येकाची तीनवेळा थर्मल टेस्ट करण्यात आली आहे. संस्थात्मक क्वारंटाईनसाठी शाळा, लॉजचा वापर करण्यात आला.>नगरपंचायत, ग्रामपंचायत, प्रशासन आणि आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम केल्याने शहरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.- दत्ता सन्नके, नगरसेवक, भाजपघरपोहोच सेवा दिल्या. भाजीपाला, फळविक्रेत्यांना पास दिले. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले. रमजान सुरू असल्याने विक्रेत्यांना सर्व नियम पाळून घरोघरी जाऊन भाजीपाला, फळे विक्रीला परवानगी दिली आहे. संसर्ग २ कुटुंबापुरताच मर्यादित राखण्यात यश आले आहे.- हमिद रोहिले, नगरसेवक, कॉँग्रेस

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस