शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जिल्हा नियोजनची वारी, विधानसभेची तयारी; कृष्णराज महाडिक, वीरेंद्र मंडलिक बैठकीला उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:28 IST

संबंध नसलेले आत आणि पत्रकार बाहेर

कोल्हापूर : कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की चर्चेत येणारे दोन युवा नेत्यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली. कृष्णराज महाडिक हे स्वतंत्रपणे आले आणि सभागृहात बसले तर मंडलिक हे शासकीय विश्रामगृहावरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत आले आणि बैठकीला उपस्थित राहिले. त्यामुळे या दोघांची ‘जिल्हा नियोजन’ची वारी आणि विधानसभेची तयारी’ अशा पद्धतीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सुरू झाली.खासदार धनंजय महाडिक पंधरा मिनिटांनी स्वतंत्र वाहनातून ताराराणी सभागृहासमोर आले आणि तेथून ते सभागृहात जावून बसले. मंडलिक हे आबिटकर यांच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्या पाठीमागेच उभे होते. वीरेंद्र मंडलिक हे अधूनमधून रोखठोक बोलत कागल तालुक्याचे राजकारण हलवू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय कलगीतुराही रंगला होता. त्यामुळे या दोन युवा नेत्यांची उपस्थिती चर्चेची ठरली.

संबंध नसलेले आत आणि पत्रकार बाहेरही बैठक संवैधानिक असल्याने या बैठकीशी संबंध नसलेल्यांनी सभागृहात प्रवेश करू नये. त्यांच्यावर कारवाई करू, असा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा देणारा फलक ताराराणी सभागृहाबाहेर लावण्यात आला आहे. परंतु संबंध नसणारे किमान १०/१५ कार्यकर्ते, नेते सभागृहात बसून होते आणि जिल्ह्याच्या विकासाचे नियाेजन नेमके कसे होते हे जनतेला सांगणाऱ्या पत्रकारांना मात्र प्रशासनाने आत बसण्यास मज्जाव केला होता. हा विरोधाभास यावेळी दिसून आला.