कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात ६ फुटाने वाढ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 06:37 PM2020-08-17T18:37:56+5:302020-08-17T18:40:28+5:30

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

Krishna-Panchganga river water level rises by 6 feet, Shri Kshetra Nrusinhwadi Datta temple under water | कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात ६ फुटाने वाढ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली

क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा- पंचगंगा नदी पत्रातील पाणी पातळीत वाढ होत असून येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.(छाया-प्रशांत कोडणीकर)

googlenewsNext
ठळक मुद्देक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा- पंचगंगा नदी पत्रातील पाणी पातळीत वाढ प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिरपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरात आज पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रातून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात गेल्या चोवीस तासात ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिरपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

आज नृसिंहवाडी परिसरात पावसाने थोडी उघडीप दिली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होत आहे. नृसिंहवाडी गावच्या तीनही बाजूला नदी असल्याने पाण्याच्या पुराने गावाला वेढण्यास सुरवात केली आहे.

येथील बाबर प्लॉट मधील रामनगर येथील काही भागातील घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तेथील लोक स्थलांतरीत होण्याच्या तयारीत आहेत. वाढलेले नदीचे पाणी दत्त देव संस्थांचे प्रसादालय, धार्मिक विधीगृह येथे शिरले असून प.प.टेंबे स्वामी महाराज नवे देवळा जवळ नदीचे पाणी आले आहे.

मंदिरात नदीचे पाणी असल्याने श्रींची उत्सवमूर्ती प.प.नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात ठेवण्यात आली असून तेथे त्रिकाळ पुजा चालू आहे.

 

Web Title: Krishna-Panchganga river water level rises by 6 feet, Shri Kshetra Nrusinhwadi Datta temple under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.