कोल्हापूरच्या 'स्वीट मून'ला जर्मनीत सर्वोत्कृष्ट लघुपटाचे मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:59 IST2025-07-02T15:56:59+5:302025-07-02T15:59:33+5:30
त्यांनी आतापर्यंत ‘भवताल’, ‘ओरिजिन’ आणि 'स्वीट सून' असे तीन कलात्मक लघुपट बनविले

कोल्हापूरच्या 'स्वीट मून'ला जर्मनीत सर्वोत्कृष्ट लघुपटाचे मानांकन
कोल्हापूर : कोल्हापूरचा युवा दिग्दर्शक मयूर कुलकर्णीचा 'स्वीट मून' या दृश्यकाव्य शैलीतील एक वेगळा कलात्मक अनुभव देणाऱ्या लघुपटाला जर्मनीमधील स्टुटगार्ट येथे होत असलेल्या २२ व्या 'द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ स्टुटगार्ट 'मध्ये उत्कृष्ट लघुपटासाठी स्पर्धात्मक विभागात मानांकन मिळालेले आहे.
आतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षवेधी ठरलेल्या 'स्वीट मून'च्या दिग्दर्शकालाही जर्मनीतील स्टुटगार्ट येथे २३ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, ही एक सन्मानाची बाब आहे. मयूर यांनी या १५ मिनिटांच्या लघुपटाचे छायाचित्रण, संकलन व दिग्दर्शन केले आहे.
ते व्यवसायाने कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘भवताल’, ‘ओरिजिन’ आणि 'स्वीट सून' असे तीन कलात्मक लघुपट बनविले आहेत आणि या तिन्ही लघुपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समीक्षकांची चांगली दाद मिळाली आहे. या लघुपटासाठी शिशीर चौसाळकर, करण चव्हाण, माधव चांदेकर, रवींद्र सुतार, विक्रम पाटील, हृषिकेश जोशी आणि साई पोतदार यांचे सहकार्य लाभले आहे.