जेईई मेन्समध्ये कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 10:49 AM2021-03-09T10:49:32+5:302021-03-09T10:52:55+5:30

JEEM Exam Kolhapur- संयुक्त प्रवेश परीक्षेतील (जॉईंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) पहिल्या टप्प्याचा निकाल सोमवारी सायंकाळी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूरच्या सहा विद्यार्थ्यांनी ९१ पर्सेंटाईलहून अधिक गुणांची कमाई करत बाजी मारली आहे. त्यात एंजेल जसनानी, आकाश सिंग, मिलिंद माळी, झोया तांबोळी, समृद्धी पाटील आणि गौरी कारंजकर यांचा समावेश आहे.

Kolhapur's six-man win in JEE Mains | जेईई मेन्समध्ये कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी

जेईई मेन्समध्ये कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी

Next
ठळक मुद्देजेईई मेन्समध्ये कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी ९१ पर्सेंटाईलहून अधिक गुण : पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर

कोल्हापूर : संयुक्त प्रवेश परीक्षेतील (जॉईंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) पहिल्या टप्प्याचा निकाल सोमवारी सायंकाळी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूरच्या सहा विद्यार्थ्यांनी ९१ पर्सेंटाईलहून अधिक गुणांची कमाई करत बाजी मारली आहे. त्यात एंजेल जसनानी, आकाश सिंग, मिलिंद माळी, झोया तांबोळी, समृद्धी पाटील आणि गौरी कारंजकर यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जेईई मेन्स ही परीक्षा दि. २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली. ही परीक्षा मे महिन्यादरम्यान विविध चार सत्रांमध्ये आणि १३ भाषांमध्ये होणार आहे. बी.ई., बी.टेक्‌., बी. आर्किटेक्ट, प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे स्वरूपही बदलले आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा दि. २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने झाली. या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर शहरातील एंजेल जसनानी याने ९८.४४ पर्सेंटाईल मिळविले.

शिरोलीमधील आकाश सिंगने ९६.१८ पर्सेंटाईल, सांगरुळ परिसरातील मिलिंद माळी याने ९२.९० पर्सेंटाईल, कोल्हापूर शहरामधील झोया तांबोळी हिने ९२.२६, वडणगे येथील समृद्धी पाटील हिने ९१.५४, तर संभाजीनगर परिसरातील गौरी कारंजकर हिने ९१.१६ पर्सेंटाईलची कमाई करत बाजी मारली. हे सर्वजण इन्स्पायर ॲकॅडमीचे विद्यार्थी आहेत. त्यांना या ॲकॅडमीच्या संस्थापक वर्षा संकपाळ, वासू गुडुरी, दीपक गुप्ता, शुभम कुमार बन्सल, आदींचे मार्गदर्शन लाभले.

परीक्षेचा दुसऱ्या टप्पा १५ मार्चपासून

या जेईई मेन्स परीक्षेचा दुसरा टप्पा दि. १५ ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. दि. २७ ते ३० एप्रिल या कालावधीत तिसरा, तर दि. २४ ते २८ मेदरम्यान चौथा टप्पा होईल.

Web Title: Kolhapur's six-man win in JEE Mains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.