शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
3
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
4
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, GT चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
5
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
6
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
7
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
8
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
9
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
10
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
11
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
13
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
14
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
15
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
16
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
17
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
18
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
19
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
20
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी

गुड न्यूज: कोल्हापूरच्या पोरी..करतात देश-विदेशात पंचगिरी; पुरुषांची मक्तेदारी मोडून उमटवला ठसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 6:02 PM

दीपक जाधव कोल्हापूर : कोल्हापूरची ओळख ही क्रीडानगरी असून येथील खेळाडू मध्ये कमालीची जिद्द, जिंकण्याची ईर्ष्या हे या मातीतील ...

दीपक जाधवकोल्हापूर : कोल्हापूरची ओळख ही क्रीडानगरी असून येथील खेळाडू मध्ये कमालीची जिद्द, जिंकण्याची ईर्ष्या हे या मातीतील अंगभूत कौशल्य. याच कौशल्याच्या जोरावर हाॅकी, नेमबाजी, क्रिकेट, फुटबॉल, कुस्ती, जलतरण, बुद्धिबळ, कबड्डी अशा सर्वच खेळांमध्ये कोल्हापूरचे नाव देशभरात पोहोचवले. नुसत्या खेळातच नव्हे तर कोल्हापूरच्या चार मुलींनी हाॅकीमध्ये पंच म्हणूनही क्रीडानगरीचे नाव उज्ज्वल केले आहे.हाॅकी तसा दुर्लक्षित राहिलेला राष्ट्रीय खेळ असून या खेळातील पंच म्हणून मुलांची मक्तेदारी मोडून काढत कोल्हापूरच्या चार मुलींनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचगिरीत नाव उंचावले आहे.

श्वेता पाटील आणि रमा पोतनीस या आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी मलेशियामध्ये प्रशिक्षण घेतले असून सिद्धी जाधव व हर्षदा लाड या राष्ट्रीय पंच आहेत.रमा पोतनीस या प्रत्येकी तीन सुवर्णपदक व रौप्यपदक विजेत्या आहेत. त्यांनी स्पेन, मलेशिया, सिंगापूर, कोरिया आदी ठिकाणी पंच म्हणून कामगिरी बजावली असून त्यांना चाचा नेहरू ॲक्सिलन्सी अवॉर्ड मिळाला आहे. अनेक वेळेस बेस्ट फाॅरवर्ड चॅम्पियन म्हणून गौरवले आहे. श्वेता पाटील एशिया कप (ओमान), फ्रान्स वि. इंडिया टेस्ट सिरीज, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बॅंकाॅक आदी ठिकाणी झालेल्या पंच म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय पंच हर्षदा लाड करवीर तालुक्यातील हसुर दुमालाच्या असून त्यांनी आजपर्यंत मिनी ऑलिंपिक, राज्यस्तरीय अनेक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय पंच सिद्धी जाधव यांनी आजपर्यंत सब ज्युनिअर नॅशनल, वेस्ट झोन विद्यापीठस्तरावर चार वेळेस खेळल्या असून दोन वेळेस रौप्य पदक मिळाले आहे. ग्वाल्हेर, दिल्ली, अमरावती येथे झालेल्या ध्यानचंद कप ऑल इंडिया स्पर्धा, खेलो इंडिया आदी स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHockeyहॉकीWomenमहिला