कोल्हापूर: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील संशयित आरोपी डॉ. विरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांनी अखेर जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शिवकुमार डीगे यांच्यासमोर आज, मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला.गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर शहरात मॉर्निंग वॉकच्यावेळी गोळीबार करण्यात आला. यात जखमी झालेल्या पानसरे यांचा चार दिवसांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. या हल्ल्यातून त्यांच्या पत्नी बचावल्या होत्या. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून डी. विरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना अटक करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षापासून हा खून खटला सुरु आहे. या हत्येचा तपास सुरुवातीला पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला होता. परंतु, नंतर २०२२ मध्ये तो महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला. उच्च न्यायालय २०१६ पासून तपासावर देखरेख करत होते. कोर्टाने या प्रकरणी तपासाबाबत अनेकवेळा ताशेरे ओढले होते.
Web Summary : Accused in Govind Pansare murder case, Virendra Tawde, Sharad Kalaskar, and Amol Kale, granted bail by Bombay High Court after a decade-long trial. Pansare was murdered in 2015; investigation transferred to ATS in 2022.
Web Summary : गोविंद पानसरे हत्याकांड के आरोपी, विरेंद्र तावड़े, शरद कलस्कर और अमोल काले को बॉम्बे हाईकोर्ट ने एक दशक बाद जमानत दी। पानसरे की 2015 में हत्या हुई थी; जांच 2022 में एटीएस को स्थानांतरित की गई।