शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

‘दाट’ धुक्यात हरविली कोल्हापूरकरांची ‘वाट’, प्रथमच बोचऱ्या थंडीची चाहुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:05 AM

कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीकिनारा, रंकाळा परिसर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शासकीय विश्रामगृह, कसबा बावडा; तर पुईखडी परिसरात दाट धुके पडत असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्हाही धुक्यात हरविल्याचे चित्र मंगळवारी सकाळी पाहण्यास मिळाले. त्यामुळे बोचऱ्या थंडीची चाहूल लागली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरसह परिसरातील चित्रकोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग परिसरात धुके चहाच्या गाड्या फुलल्याबोचऱ्या थंडीस सुरुवात

कोल्हापूर : शहरातील पंचगंगा नदीकिनारा, रंकाळा परिसर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शासकीय विश्रामगृह, कसबा बावडा; तर पुईखडी परिसरात दाट धुके पडत असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्हाही धुक्यात हरविल्याचे चित्र मंगळवारी सकाळी पाहण्यास मिळाले. त्यामुळे बोचऱ्या थंडीची चाहूल लागली आहे.दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान व कोजागिरी पौर्णिमेनंतर हळूहळू थंडीची सुरुवात होते. यंदाही गेल्या दोन दिवसांपासून थंडीला सुरुवात झाल्याने रात्री दोननंतर रस्त्यांवर दवबिंदूंची सुरुवात होते.

हळूहळू करीत पहाटे चारच्या सुमारास अक्षरश: पंचगंगा नदी, रंकाळा तलावाचा परिसर, साने गुरुजी वसाहतीचा परिसर, कळंबा परिसर, शिवाजी विद्यापीठाचा परिसर तर नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कसबा बावड्याचा परिसर, कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गासह अन्यत्रही धुके पडत आहे. या दाट धुक्याचा आनंद लुटण्यासाठी बालगोपालांसह वृद्धांचीही फिरण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.

अंगावर शाल, मफलर घेऊन ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही मोठ्या प्रमाणात या दाट धुक्याचा आनंद घेण्यासाठी पहाटे फिरावयास बाहेर पडताना दिसत आहेत. या दाट धुक्यामधून वाट काढतच वाहनांचा प्रवास सुरू होता. दाट धुक्यामुळे दोन फुटांवरीलही काही दिसत नव्हते. सूर्यनारायणाचे दर्शनही सकाळी साडेनऊनंतर झाले.

चहाच्या गाड्या फुलल्यायंदा उशिराच बोचऱ्या थंडीस सुरुवात झाली आहे. त्यातच दाट धुके असे आल्हाददायक व आरोग्याला पोषक वातावरण असल्याने पहाटेस फिरावयास गेलेले नागरिक फिरणे झाल्यानंतर चहाच्या गाडीवर चहा पिण्यासाठी थांबल्याचे चित्र मंगळवारी दिसत होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatureनिसर्ग