शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर झेडपीचा प्रवास, पॉवर हाऊस ते कागलकर हाऊस; कुणाकडून, किती लाखांना घेतली ही ऐतिहासिक वास्तू.. वाचा सविस्तर

By समीर देशपांडे | Updated: January 23, 2026 16:13 IST

सध्याच्या इमारतीला झाली ३२ वर्षे

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेचा प्रवास हा सध्याची करवीर पंचायत समितीची इमारत म्हणजेच संस्थानकालीन पॉवर हाऊस, नंतर नागाळा पार्कमधील कागलकर हाऊस आणि आता सध्याची देखणी अशी चौमजली सुसज्ज इमारत असा झाला आहे. ३२ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान सहाय्य यांनी वैयक्तिक लक्ष देऊन या इमारतीचे बांधकाम करून घेतल्याचे आजही ही इमारत मजबूत असल्याचे पहावयास मिळते.१ मे १९६२ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. कोल्हापूरच्या टाऊन हॉल परिसरातील तत्कालीन पॉवर हाऊस म्हणजेच सध्या जिथे करवीर पंचायत समिती कार्यरत आहे तेथे जिल्हा परिषदेच्या कारभाराची सुरुवात झाली. १९२९ मध्ये कागलच्या बापूसाहेब महाराजांनी कोल्हापुरात दुसरी वीज कंपनी सुरू केली होती. या कंपनीचे पॉवर हाऊस या ठिकाणी होते. त्यांनी डिझेलची मोठी इंजिने वापरून वीज निर्मिती सुरू केली. याच पॉवर हाऊसच्या जागेत पहिली २० वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू चालले. परंतु जागेअभावी चार विभाग अन्यत्र विविध ठिकाणी कार्यरत होते.दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या कामकाजाची व्याप्ती वाढू लागली आणि ही जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे जिल्हा परिषदेने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर जागा घेतल्या. राजारामपुरीतील जनता बझारजवळ, टाकाळ्यावर, मराठा बँकेसमोर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जागेतही काही काळ काही कार्यालयांचे कामकाज चालले. आता करवीर पंचायत समितीचे जे सभागृह आहे तेथे जिल्हा परिषदेचे सभागृह होते.

पाच लाखात कागलकर हाऊसची खरेदी१९८९ साली मोठा पूर आल्याने करवीर पंचायत समितीच्या जागेत असणाऱ्या अनेक फाईल्स त्यावेळी वाहून गेल्या. रात्री फोन करून एकमेकांना बोलावून शक्य तेवढे दप्तर वाचवण्यात आले अशीही आठवण सांगण्यात येते. जिल्हा परिषदेची स्वमालकीची इमारत असावी व सर्व विभाग एकाच इमारतीत असावेत या दृष्टीने १७ डिसेंबर १९७६ रोजी जिल्हा परिषदेने कागलकर हाऊस ही ऐतिहासिक वास्तू प्रवीणसिंह घाटगे यांच्याकडून ५ लाख १४३ रुपयांना खरेदी करण्यात आली. पुन्हा जिल्हा परिषदेचे कामकाज, विभागांची संख्या वाढू लागली, सर्वसाधारण बैठक व इतर बैठकांना जागा अपुरी पडू लागल्याने सुसज्ज इमारत बांधण्यासाठी १९९३ मध्ये २ कोटी ४ लाख ३१ हजार ५ रूपये खर्चून नवी इमारत बांधण्यात आली. त्यासाठी घाटगे यांचीच समोरची एक एकर जागा पुन्हा खरेदी करण्यात आली.

१९९४ मध्ये इमारतीचे उद्घाटनतत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल १९९४ रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. १ ऑगस्ट १९९४ पासून नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कारभाराला सुरुवात झाली. नंतर तीन मजलेही अपुरे पडू लागल्याने तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चौथ्या मजल्याला परवानगी दिली आणि १० कोटीचा निधीही उपलब्ध करून दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP's journey: From power house to a grand building.

Web Summary : Kolhapur Zilla Parishad began in a former power house, then shifted to Kagalkar House bought for ₹5 lakh. A new building was inaugurated in 1994 costing ₹2.04 crore, later expanded with a fourth floor.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूर