कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ६८ जागांपैकी १९ जागांचे अधिकृत निकाल जाहीर झाले असून सर्वाधिक ६ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्याखालोला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी ४ ठिकाणी विजय मिळवला असून शिंदेसेना ३ जागांवर विजयी झाली आहे. जनसुराज्यनेही दोन जागांवर गुलाल उधळला आहे. सुरूवातीपासूनच काँग्रेसच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी आघाडी घेतली होती. विचारपूर्वक उमेदवार देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या वादळात दिवा लावण्यासाठी नियोजन केले होते. त्याला यश मिळतानाही दिसत आहे. करवीर तालुक्यातील जाहीर चार जागांपैकी दोन ठिकाणी भाजप, एक ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी शिंदेसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शाहूवाडी तालुक्यात राष्ट्रवादीने खाते उघडले आहे. राधानगरीमध्येही काँग्रेसने खाते उघडले असून कागल तालुक्यात भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीच्या एक उमेदवार विजयी झाल्या आहेत. हातकणंगले तालुक्यात काँग्रेसने दोन ठिकाणी तर जनसुराज्यने एका जागेवर विजय मिळवला आहे.गडहिंग्लज तालुक्यात जनसुराज्यने खाते उघडून इतर पक्षांना धक्का दिला आहे. तर आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे.भुदरगड तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तालुक्यातील जाहीर दोन्ही जागा शिंदेसेनेने पटकावल्या आहेत. तर गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा कॉंग्रेसने पटकावल्या आहेत. आतापर्यंतचे विजयी उमेदवार१ विश्वनाथ पाटील - काँग्रेस - शिये करवीर२ इंद्रजित पाटील - शिंदेसेना - वडणगे३ नामदेव वाईंगडे - भाजप - उचगाव४ तानाजी पाटील - भाजप - मुडशिंगी५ राजकुंवर गायकवाड - राष्ट्रवादी - बांबवडे६ सागर धुंदरे - कॉंग्रेस - राशिवडे७ सुयशा घाटगे - भाजप - सिध्दनेर्ली८ शोभाताई फराकटे - राष्ट्रवादी - बोरवडे९ शिवानी भोसले - भाजप - चिखली१० डॉ. जयंत पाटील - राष्ट्रवादी - सातवे११ शुभांगी कुंभार - कॉंग्रेस, - घुणकी१२ सोनाली सावंत - कॉंग्रेस - भादोले१३ शीतल प्रविण यादव - जनसुराज्य - कुंभोज१४ अनिरूध्द रेडेकर - जनसुराज्य - नूल१५ शिरीष देसाई, - राष्ट्रवादी - उत्तूर१६ अर्चना कल्याण निकम - शिंदेसेना - आकुर्डे१७ सारिका यशवंत नांदेकर - शिंदेसेना - कडगाव१८ सोनाली विलास पाटील - कॉंग्रेस - तिसंगी१९ संभाजी शांताराम पाटणकर - कॉंग्रेस - असळज
Web Summary : In Kolhapur ZP polls, Congress secured 6 seats out of 19 declared, leading amidst the MahaYuti's influence. NCP and BJP won 4 each, while Shinde Sena got 3. Satej Patil's strategic planning proved effective.
Web Summary : कोल्हापुर ZP चुनावों में, कांग्रेस ने महायुति के प्रभाव के बीच घोषित 19 में से 6 सीटें हासिल कीं। NCP और BJP ने 4-4 सीटें जीतीं, जबकि शिंदे सेना को 3 मिलीं। सतेज पाटिल की रणनीतिक योजना प्रभावी साबित हुई।