शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: संजय मंडलिक यांना नव्याने करावी लागणार गटाची बांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:54 IST

भविष्यातील राजकीय समीकरणांची उत्सुकता

जहांगीर शेख

कागल : तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे एकत्र आल्यानंतर निकाल फार काही वेगळा लागण्याची शक्यता नव्हतीच. स्थानिक परिस्थितीतून पंचायत समितीची एक जागा माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पदरी पडली. त्यात कोणी नेत्याने आत्मचिंतन करावे, अशीही स्थिती नाही. मात्र, या निकालाने मंत्री मुश्रीफांच्या नेतृत्वाला नवी झळाळी मिळाली. दोन्ही घाटगे एकत्रितपणे सत्तेच्या प्रवाहात आले. या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांना भविष्याच्या राजकारणाचा वेध घेऊन गटाची नव्याने बांधणी व वाटचाल निश्चित करावी लागणार आहे.या निवडणुकीच्या दरम्यान अनेक प्रमुख कार्यकर्ते मंडलिक गट सोडून गेले आहेत, जे अनेक वर्षे चिवटपणे राजकीय संघर्ष करत होते. या निवडणुकीत अनेक उमेदवार मंडलिकांना आयते मिळाले. त्यांनी मतेही चांगली घेतली. आता गट अथवा पक्ष म्हणून त्यांना आपल्यासोबत कायम ठेवण्याचे आव्हान पेलावे लागेल. आता लोकसभेशिवाय सार्वजनिक निवडणूक नाही. मात्र, ५३ ग्रामपंचायती, जिल्हा बँक, ‘गोकुळ’च्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंडलिकांनी वाटचाल निश्चित करावी लागेल.मुश्रीफांचा जिल्हाभर डंका दोन घाटगेंना एकत्र आणून विजयाचा मार्ग मोकळा केल्यानंतर जिल्हाभर जोडण्या लावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना पुरेसा वेळ मिळाला. त्यांनी मुत्सद्देगिरी करत उमेदवार निवडले. जिल्हाभर प्रचारसभा घेत प्रचारात आघाडी घेतली आणि साथीला उमेदवार कार्यकर्ते यांना रसदही पोहोचविली. याचा परिपाक म्हणजे कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आलीच, पण जिल्ह्यात सर्वांत जास्त जिल्हा परिषदेचे सदस्यही निवडून आले. जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती आणि आता जिल्हा परिषदेवर त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे.राजे गटाला गुलाल लागला दोन विधानसभा व गत जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीत राजे गटाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने हे कार्यकर्ते सार्वजनिक निवडणुकीच्या गुलालापासून वंचित होते. अखेर आपल्या गटाला सत्तेत आणण्यात समरजित घाटगे यशस्वी झाले आहेत.नवीद , अंबरिष यांना उभारीसंजय घाटगे गटाला दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागा मिळाल्याने अंबरिष घाटगे यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाली आहे. ‘गोकुळ’चे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी कागल-गडहिंग्लज-,उत्तूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election 2026: Mandlik Needs to Rebuild His Base

Web Summary : Following ZP election results, Sanjay Mandlik faces rebuilding his base. Unified Ghatge and Mushrif gain power, impacting future Kolhapur politics. Focus shifts to upcoming local elections.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफsanjay mandlikसंजय मंडलिकSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेPoliticsराजकारण