शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:58 IST

पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कोल्हापूरचीच चर्चा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्याशाळांचा गुणात्मक आणि सुविधात्मक सर्वांगीण विकास करण्यासाठी कोल्हापूरजिल्हा परिषदेने राबविलेले शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात लागू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली.बालेवाडी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी उत्तम सादरीकरण आणि उत्तम याेजनांच्या अंमलबजावणीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, ‘डायट’चे तत्कालीन प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, इचलकरंजी महापालिकेेचे शिक्षणाधिकारी भिकाजी कासार उपस्थित होते.दादा भुसे म्हणाले, परख, आधार पडताळणी, अपार आयडी तयार करणे, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही, पायाभूत आणि क्रीडा सुविधा, पदोन्नती या सर्वच बाबतीत कोल्हापूर जिल्हा परिषद अग्रेसर असून, त्यांचे हे सर्व उपक्रम, योजना आणि कार्य राज्यासाठी दिशादर्शक आहे. यातील अनेक उपक्रम हे राज्यभरात राबविले जाणार आहेत.यावेळी सविस्तर सादरीकरण करताना कार्तिकेयन म्हणाले, समृद्ध शाळा या उपक्रमांतर्गत आम्ही पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शाळा, अतितत्काळ दुरुस्तीच्या शाळा अशी वर्गवारी केली आहे. ‘मिशन शाळा कवच’मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ‘मिशन सूर्यकिरण’ अंतर्गत सौरऊर्जेचा वापर वाढवण्यात येणार आहे. मिशन उत्कर्षमध्ये आम्ही राज्यात पहिले आलो आहोत. आता देशात पहिला येण्यासाठी नियोजन सुरू आहे.

परिषदेत कोल्हापूरचीच चर्चाकार्तिकेयन एस. हे तामिळनाडूमधील असूनही त्यांनी सर्व सादरीकरण उत्तम पद्धतीने मराठीमध्ये सादर केले. स्पष्ट संकल्पना, त्याच्यासाठी आकडेवारीचा वापर आणि एकापेक्षा एका उपक्रमाची प्रभावी मांडणी यामुळे कार्तिकेयन यांच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. दोन दिवसांच्या या परिषदेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्याच उपक्रमांची चर्चा सुरू होती.