शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यागांचे अर्ज भरण्यास पाचगावातून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:19 AM

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत पाचगाव येथे आज दिव्यांगांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने आपली स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यागांचे अर्ज भरण्यास पाचगावातून प्रारंभआठ हजारांहून अधिक दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत पाचगाव येथे आज दिव्यांगांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने आपली स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे.दोन महिन्यांपूर्वी या अभियानातंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून चाळीस हजारांहून अधिक दिव्यांगांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबत अजूनही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यांच्याकडे यंत्रणा असतानाही अजूनही आठ हजारांहून अधिक दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत आहेत.या पार्श्वभूमीवर या सगळ्याच प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी चार विशेष शिक्षकांची प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेकडे नियुक्ती करून घेतली आहे. त्यांना आणखी दोन कर्मचारी आणि चार लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हे पथक आपल्या कामाला आजपासून सुरूवात करणार असून पाचगावमधील ९७ दिव्यांगांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर हे अर्ज आॅनलाईन भरले जातील आणि त्यांना नंतर प्रमाणपत्र दिले जाईल. आॅनलाईन अर्ज भरणेच या दिव्यांगांसाठी जिकीरीचे असल्याने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने आपल्या शिरावर घेतली आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर