कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
By समीर देशपांडे | Updated: September 12, 2025 14:12 IST2025-09-12T14:10:11+5:302025-09-12T14:12:05+5:30
नेतेमंडळींच्या पत्नी, सुना निवडणूक रिंगणात उतरणार

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
कोल्हापूर : येत्या दोन महिन्यात होवू घातलेल्या निवडणुकांनतर कोल्हापूरजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर २५ रोजी अधिसुचना काढली. त्यामुळे आता मातब्बर नेतेमंडळींच्या पत्नी, सुना निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा - कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी
दिवाळीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. त्यासाठीची प्रभाग रचना निश्चित झाली असून आरक्षणाची प्रतिक्षा आहे. प्रभाग रचनेवरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अशातच जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने आता आणखी चुरस वाढणार आहे.
वाचा - ‘मिनी मंत्रालया’साठी आधी कुस्ती, नंतर दोस्ती; कोल्हापुरात महायुती, आघाडीची स्वबळाची चाचपणी