शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर, कही खुशी..कही गम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:44 IST

पंचायत समित्यांसाठी तालुका पातळीवर आरक्षण सोडत प्रक्रिया सुरु आहे.

कोल्हापूर: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेसाठीकोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर तर, बाराही पंचायत समित्यांसाठी तालुका पातळीवर आरक्षण सोडत प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा परिषदेसाठी १० मतदार संघाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सिध्दनेर्ली, सातवे, पोर्ले तर्फ ठाणे, गोकुळ शिरगाव, कोतोली, सरुड, चिखली (कागल), हलकर्णी, निगवे खालसा, कळे हे मतदार संघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. तर, अनुसूचित महिलासाठी पट्टणकोडोली हा मतदारसंघ आरक्षित झाला आहे.

ओबीसी आरक्षण, मतदारसंघ - हेरले, कोडोली, पूणाल, घुणकी, रेंदाळ, दत्तवाड, शिये, वडणगे, पिंपळगाव (भुदरगड), उत्तुर, नेसरी, गवसे, माणगाव, कडगाव, भुदरगड, कुदनुर, अब्दुल लाट, रूकडी, यड्राव, दानोळी, राशिवडे बुद्रुक

ओबीसी (महिला) - हेरले, कोडोली, पूणाल, घुणकी, रेंदाळ, दत्तवाड, शिये, वडणगे, पिंपळगाव (भुदरगड), उत्तुर, नेसरी, गवसे,  माणगाव (चंदगड), कडगाव (भुदरगड), कुदनुर, अब्दुल लाट, रूकडी, यड्राव, दानोळी, राशिवडे बुद्रुक.

ओपन महिला - सावे, येळवण जुगाई, टोप, भादोले, कुंभोज, चंदुर, बोरवडे, पाचगाव, वाशी, सांगरुळ, उदगाव, परिते, उचगाव, शिरोली दुमाला, तिसंगी, आकुर्डे, वाडी रत्नागिरी,  कसबा वाळवे, सरवडे, पेरनोली, तुर्केवाडी, असलाज.

जिल्ह्यातील प्रभाग रचनेवरून अनेक तक्रारी झाल्या आहेत. यावर न्यायालयात तक्रारीही झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले असून, याबाबत आता आज, सुनावणी होणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीबाबत न्यायालयात काही निर्णय होतो का हे देखील पाहावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या ७६ जागा असून, पंचायत समित्यांच्या १५२ जागा आहेत. याआधी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाला वगळून आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्या टक्केवारीनुसार आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या आरक्षित गटातील जागा ठरणार आहेत.

पन्हाळा, मलकापूर नगरपालिकांसाठीही आरक्षण सोडतजिल्ह्यातील पन्हाळा आणि मलकापूर या दोन नगरपालिकांसाठीही आरक्षण सोडत होणार आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या प्रत्येकी ५ जागा आहेत. पूर्वी निवडणूक जाहीर झालेल्या अन्य सहा नगरपालिकांचा आरक्षण सोडतीत समावेश नाही.जिल्ह्यातील मलकापूर, पन्हाळा, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगुड, कुरुंदवाड या आठ नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यापैकी मलकापूर व पन्हाळा वगळता अन्य ६ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता, तो स्थगित करण्यात आला.

ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर येथे नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आज गुरुवारी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली आहे. मात्र यात नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम पूर्वी जाहीर झाला होता त्या नगरपालिकांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आज गुरुवारी फक्त पन्हाळा आणि मलकापूर या दोन नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदreservationआरक्षण