शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेशप्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेचीही चौकशी सुरू, पोलिसांकडून मूळ धनादेश ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:03 IST

मुश्रीफांच्या आरोपाला उत्तर काय द्यायचे?

कोल्हापूर : तीन बनावट धनादेशांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला तब्बल ५७ कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा डाव उघडकीस आल्यामुळे जिल्हा परिषदेचा वित्त विभाग कमालीचा सावध झाला आहे. त्यामुळे तीन धनादेशांच्या पुस्तिकेतील तब्बल एक हजार धनादेश रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. तसे पत्र कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देण्यात आले आहे. दरम्यान, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणातील तीन मूळ धनादेश ताब्यात घेतले.जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडील तीन खाती जिल्हा बँकेत आहेत. यामध्ये हस्तांतरण, स्वनिधी आणि अभिकरण या खात्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणावर धनादेश लागत असल्याने धनादेशांच्या मोठ्या पुस्तिका घेण्यात येतात. परंतु, तीन बनावट धनादेशांच्या माध्यमातून ५७ कोटींची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याने वित्त विभागही हडबडला आहे. तातडीने हालचाली करीत संबंधित रक्कम रोखण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले. परंतु, यातून अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.पुन्हा याच पद्धतीने फसविण्याचा प्रकार होऊ नये म्हणून या तीनही खात्यांचे जवळपास एक हजार धनादेश अजूनही शिल्लक आहेत. हे सर्व धनादेश रद्द करण्यासाठी वित्त विभागाने जिल्हा बँकेला पत्र दिले. पोलिसांनी मूळ धनादेशाबरोबरच आणखी काही आवश्यक कागदपत्रे गुरुवारी जिल्हा परिषदेतून नेली. साध्या वेशातील पोलिसांनी येऊन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांच्याशी याबाबत चर्चा केली.

मुश्रीफांच्या आरोपाला उत्तर काय द्यायचे?जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन वित्त विभागातीलच कोणीतरी या प्रकारात सामील असू शकतो, असा आरोप केल्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी पेचात सापडले आहेत. थेट मंत्र्यांनीच हा आरोप केल्याने त्याला महत्त्वही प्राप्त झाले आहे.

जोरदार चर्चाया प्रकरणाची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इतक्या मोठ्या रकमेचे बनावट धनादेश करणे आणि ते वटण्याची प्रक्रिया सुरू होणे यामध्ये एखादी टोळी सामील असण्याची शक्यता असून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील ‘टिप्सर’ही यात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदPoliceपोलिस