शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बोगस प्रमाणपत्र देणारे शिक्षक अन् योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या लाडक्या बहिणी गोत्यात, कोल्हापूर जिल्ह्यात किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:13 IST

जि.प. साईओंनी दिले चौकशीचे आदेश

कोल्हापूर : बदलीसाठी दिव्यांग आणि आजारपणाची प्रमाणपत्रे सादर करणारे जिल्ह्यातील ३५६ प्राथमिक शिक्षक आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या २३ महिला कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले आहेत. याआधी तालुका पातळीवर कोड स्कॅन करून खातरजमा केल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत होते. मात्र, तक्रारी वाढतच निघाल्याने हा चौकशीचा निर्णय घेण्यात आला.‘लाडकी बहिणी’ योजनेतून राज्यातील जिल्हा परिषदांच्या ११०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आले आहे. याची आकडेवारी राज्याकडून जिल्हा परिषदांना पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २३ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या कर्मचारी जिल्हा परिषद मुख्यालयातील आहेत की, पंचायत समितीमधील याची छाननी करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व विभागांना पत्रे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.शिक्षकांच्या बदलीमध्ये ‘संवर्ग १’ मध्ये दिव्यांग आणि गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना सूट दिली जाते. १२ शारीरिक आजारांपैकी व्याधीग्रस्त व दिव्यांग शिक्षक या विशेष तरतुदीचा लाभ घेतात. अशा ३५६ शिक्षकांपैकी काहींनी बाेगस प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कार्तिकेयन यांनी या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठांता यांच्याकडे ही सर्व प्रकरणे वर्ग करून या प्रमाणपत्रांची छाननी करण्याची मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.

दिव्यांग, गंभीर आजार प्रमाणपत्रानुसार लाभ घेतलेल्या शिक्षकांची तालुकावार संख्या

  • करवीर - ६१
  • शिरोळ - ६१
  • हातकणंगले - ४०
  • राधानगरी - ३९
  • गडहिंग्लज - २५
  • कागल - २४
  • पन्हाळा - २४
  • भुदरगड - २३
  • आजरा - २०
  • शाहूवाडी - २०
  • चंदगड - १२
  • गगनबावडा - ०७
  • एकूण - ३५६

शिक्षक बदली प्रक्रियेदरम्यान ज्यांनी दिव्यांग आणि गंभीर आजार याबाबत प्रमाणपत्रे सादर केली आहेत. त्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे याची खात्री करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांचीही चौकशी त्वरित करण्यात येत आहे. - कार्तिकेयन एस. , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर